देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वाघाळ्याच्या कलाकाराचे पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात !

admin by admin
July 31, 2025
in मराठवाडा
0
वाघाळ्याच्या कलाकाराचे पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात !
Please Share

पालकमंत्री बोर्डीकर यांचा पुढाकार, सुशील घुंबरे यांच्या कलेचा गौरव

पाथरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांची नुकतीच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ऐतिहासिक नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पाथरी (जि.परभणी) तालुक्यातील वाघाळा येथील युवा चित्रकार सुशील घुंबरे यांनी स्वहस्ते बनवलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेले “जपतो आम्ही शिवछत्रपतीचा वारसा” या कॅनव्हास पेंटिंगने मंगळवारी, २९ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात स्थान मिळविले आहे.

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून कॅबिनेट बैठक संपल्यानंतर हे पेंटिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यात आले. या वेळी मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, आमदार मोनिका राजळे, सीमा हिरे, सुरेश धस, आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर तसेच हनुमान घुंबरे आदींची उपस्थिती होते. राज्य सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे काही दिवसांपूर्वी स्वराज्यातील १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे, याचा आनंद महाराष्ट्रासह देशातील सर्व शिवप्रेमींना झाला आहे. राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी चित्रकार सुशील घुंबरे यांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून छत्रपती शिवराय व किल्ले रायगडाची कलात्मक अशी एक पेंटिंग तयार करण्यास सांगितले होते. सुशील घुंबरे यांनी अगदी कमी वेळेत हे अतिशय सुंदर शिवाजी महाराजांचे पेंटिंग तयार केले. घुंबरे यांच्या कलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून कौतुक केले आहे.

Post Views: 1,288
Please Share
Previous Post

अपूर्वा तंत्रनिकेतनचा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग

Next Post

‘वाळसरा’ त ग्रामीण जीवनाचा बदलता पट

admin

admin

Next Post
'वाळसरा' त ग्रामीण जीवनाचा बदलता पट

'वाळसरा' त ग्रामीण जीवनाचा बदलता पट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ