देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in परभणी
0
श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रतिसाद
Please Share

१५ ऑगस्टला माऊलींचा जन्मोत्सव

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रावणमासानिमित्त २५ जुलैपासून सेलू येथे आयोजित श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रवचनमालेचे हे २१ वे वर्ष आहे. यावर्षी पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनाने सुरूवात झाली. २३ ऑगस्टरोजी सांगता आहे. दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आपली सेवा रुजू करत आहेत. रविवारी, ३ ऑगस्टरोजी ब्रह्माकुमारी सीमा बहेन यांचे हरिपाठातील  ‘देवाचिये द्वारी, उभा क्षण भरी’ या अभंगावर प्रवचन झाले. त्यांनी सलोकता, समिपता, स्वरूपता आणि सायुज्जता या चार मुक्तींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. विकारशस्त्रूंवर विजय मिळविण्यासाठी, मी कोण आहे याचे आत्मभान ठेवून प्रार्थना आणि ध्यान, समर्पण आणि परोपकारभावाने सेवा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.

१७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ७ ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शंतनू महाराज पाठक (वालूर) यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सांगता आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

१५ ऑगस्टला माऊलींचा जन्मोत्सव

श्रावणमासानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे २१ वे वर्ष आहे. कोविड काळातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही प्रवचन सेवा अखंडपणे चालवली गेली आहे. या प्रवचनमालेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवचनासाठी निमंत्रित सेवेकरी मानधन घेत नाहीत. वेळेची शिस्त आणि आयोजनातील साधेपणा आजही जपला गेला आहे. यावर्षी १५ ऑगस्टरोजी  संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जंयती वर्षानिमित्त माऊलींचा आगळावेगळा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे, असे आयोजकांनी सागंतिले.

Post Views: 1,350
Please Share
Previous Post

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी शिवहारी शेवाळे

Next Post

नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या

नरसापूर, अजंठा, वंदे भारत गाड्यांना सेलू स्थानकावर थांबा द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ