देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान जमा करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 29, 2025
in परभणी
0
शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान जमा करा
Please Share

‘आपले पालम’ ग्रुपच्या वतीने धरणे आंदोलन; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पालम : पालम शहर आणि तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पूर्णपणे वाहून गेले असून, निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपले पालम’ या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दसरा आणि दिवाळीसारखे सण जवळ आल्यामुळे, शेतकऱ्यांना सण साजरा करता यावा यासाठी त्यांच्या बँक खात्यावर त्वरित अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी आंदोलकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयामार्फत पाठवले. केवळ पंचनामे न करता, पालम तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना सरसकट कर्जमाफी, प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, या अतिवृष्टीमुळे पालम तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करावी आणि ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत, त्यांनाही भरीव मदत करावी, अशी मागणी निवेदनात आहे. पालम तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला नाही, तर ग्रुपच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Post Views: 1,246
Please Share
Previous Post

खरीप पिके उद्ध्वस्त; पावसाचा कहर सुरूच

Next Post

३७ गावे ‘पुराचा धोका’ यादीत घ्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
३७ गावे ‘पुराचा धोका’ यादीत घ्या

३७ गावे 'पुराचा धोका' यादीत घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ