देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रद्धा,अक्षरा, साक्षी राठोड विजेत्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 24, 2025
in परभणी, मराठवाडा
0
श्रद्धा,अक्षरा, साक्षी राठोड विजेत्या
Please Share

हेलस सानेगुरुजी कथामालेच्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला प्रतिसाद

सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (जि. जालना) व मानस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य सानेगुरुजी यांच्या जयंतीनिमित्त २४ डिसेंबर रोजी आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेअंतर्गत परभणी जिल्हास्तरीय फेरी बुधवारी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साने गुरुजी कथामालेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सतीश कुलकर्णी व प्रमोद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत बालगट आणि किशोर गट अशा दोन गटांत एकूण ४८ स्पर्धकांनी आपली कला सादर केली. यामध्ये बालगटातून ३३ तर किशोर गटातून १५ स्पर्धकांचा समावेश होता.

स्पर्धेच्या निकालामध्ये बालगटात अक्षरा गजानन पवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू) आणि साक्षी कृष्णा राठोड (जि. प. शाळा, पारडी) यांनी प्रथम क्रमांक विभागून पटकावला. द्वितीय क्रमांक अनया विजय ढाकणे हिने मिळवला, तर तृतीय क्रमांक मनवा प्रमोद देशमुख आणि सिया मदन गरगटे यांना विभागून देण्यात आला. तसेच ईश्वरी अमोल राठोड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.किशोर गटामध्ये श्रद्धा दिगंबर काकडे (नूतन कन्या प्रशाला, सेलू) हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. द्वितीय क्रमांक सय्यद सना शौकत आणि लावण्या दीपक शेरे यांनी विभागून पटकावला. तृतीय क्रमांक स्वरा सुदीप देशपांडे हिला मिळाला, तर अमृता दिगंबर हरकळ हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ नाट्यकर्मी रवींद्र मुळावेकर व सुभाष मोहकरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिल्हा संयोजक डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले, तर आभार बाळू बुधवंत यांनी मानले. या वेळी कीर्ती राऊत, वर्षा कदम, भगवान पावडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि कथामाला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,862
Please Share
Previous Post

वनामकृवि आणि आयपीडीए यांच्यात सामंजस्य करार

Next Post

डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष

डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ