परभणी : मानवसेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने मातृत्वाचा गौरव करण्यासाठी २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान ‘आई महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राजीव गांधी विद्यालयात दररोज सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार आहेत.२१ जानेवारी रोजी गणेश शिंदे ‘जीवन सुंदर आहे!’ या विषयावर विचार मांडतील. २२ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कवयित्री कांताबाई शिंदे यांचे ‘ज्योती-साऊंची पुण्याई’ या विषयावर काव्यगायन आहे. २३ जानेवारी रोजी ठाण्याचे प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे ‘आई… तुझा हात परीस!’ या विषयावर भाष्य करतील.या कार्यक्रमाला माधवराव मामा फड, कवी इंद्रजीत भालेराव आणि कृषीभूषण कांतराव झरीकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान व समाजकार्य महाविद्यालय यांच्या समन्वयाने आयोजित या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोपाळ केशवराव भुसारे आणि संयोजकांनी केले आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....




