देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 8, 2026
in परभणी
0
श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात
Please Share

सेलूतील विवेकानंद नगरात जमली भक्तांची मांदियाळी

सेलू जि.परभणी : ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात सेलू येथील स्वामी विवेकानंद नगरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने या महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्री गजानन महाराजांच्या महतीचे वर्णन केले. तसेच नर्मदा परिक्रमा आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद केले. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड, मनीष कदम, मिलिंद पवार, आप्पा आनंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थानतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर दुपारी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद घेतला. सकाळपासून सायंकाळीही दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंदनगर परिसरातील रहिवासी आणि मंदिर कार्यकारी मंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,869
Please Share
Previous Post

चारित्र्य हीच खरी संपत्ती : इंदुरीकर महाराज

Next Post

ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ

ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ