देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in परभणी
0
कलाप्पा हुगे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार
Please Share

संस्कार आणि संस्कृतीसाठी गुरुचरणी लीन व्हावे : काशिनाथ महाराज पाथ्रीकर

सेलू : येथील शंकरलिंग मंदिराच्या वतीने आयोजित महाशिवरात्री महोत्सवात प्रासादिक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ष.ब्र. काशिनाथ महाराज पाथ्रीकर यांनी सांगितले की, जीवनात यश, कीर्ती आणि समाधान प्राप्तीसाठी संस्कारसंपन्न जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

जीवनरुपी शरीराला योग्य संस्कार देण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरू शिष्याला भरकटू न देता संस्कृती प्राप्तीचा योग्य मार्ग दाखवतात. आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी सहज मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा कष्टाने आणि टिकणारे ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे.अध्यक्षीय समारोप करताना देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर म्हणाले की, महाशिवरात्री महोत्सव संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, पूर्ण सप्ताहात महिला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली हे कौतुकास्पद आहे. याप्रसंगी शंकरलिंग मंदिर देवस्थान व वीरशैव लिंगायत समाजसेवा समितीच्या वतीने यावर्षीचा समाजभूषण गौरव पुरस्कार शिवऐक्य कलाप्पा विश्वनाथआप्पा हुगे (पुणे) यांना मरणोपरांत प्रदान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक कमलबाई झमकडे, शिलाताई काजळे, गणेश स्वतःचे, कपिल फुलारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सप्ताहादरम्यान रुद्राभिषेक, परमरहस्य ग्रंथ पारायण, शिवगाथा भजन आणि कीर्तन असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी अन्नदाते नागनाथ हमाणे, रामदास पाटील, अरुणआप्पा सोळंके, वीरशैव महिला इरवंत मठपती, मंगेश महाजन, रामभाऊ राऊत आणि हुगे परिवाराचा सन्मान करण्यात आला. मृदंग वादक भारत पार्डिकर, कथा वाचक गुरुलिंगआप्पा फुटके, कैलास स्वामी थळपती, कैलास स्वामी मिटकर, पवन स्वामी कामटे, वंदना थळपती, श्रद्धा तेजबंद यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम राऊत यांनी केले, सूत्रसंचालन सचिव मिलिंद झमकडे यांनी, प्रमाणपत्र वाचन महादेव आगजाळ यांनी तर आभार प्रदर्शन पवन मिटकरी यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बबनआप्पा झमकडे, दत्तात्रय मिटकर, रामाप्पा तोडकर, उत्तरेश्वर साडेगावकर, प्रकाश साखरे, विश्वनाथ हुगे, शुभंम महाजन, शुभंम सोळंके, शुभंम नवघरे, अशोक मसुरे, मिठुआप्पा औरंगे, राजेंद्र काळबांडे, हरिभाऊ काळे, जगदिश जोशी महाराज, बालाजी राऊत, संजय झमकडे, मयुर महाजन आणि श्रेयस महाजन यांनी परिश्रम घेतले.फोटो ओळी:समाजभूषण पुरस्कार सद्गुरू काशिनाथ पाथ्रीकर महाराज यांच्या हस्ते स्वीकारताना हुगे परिवार. सोबत संस्थानचे अध्यक्ष अशोक वाडकर, दत्तात्रय मिटकर, बबनआप्पा झमकडे, सोमेश हुगे आणि राजेंद्र काळबांडे.

Post Views: 1,812
Please Share
Previous Post

परीक्षेतून आयुष्य घडते : राहुल गिरी

Next Post

महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

महादेव आगजाळ, नेमिनाथ जैन यांना जिल्हा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ