शिवदास काळबांडे यांचे प्रतिपादन, आदर्श विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात
परभणी : राष्ट्रसंत गाडगे महाराज हे विवेक जागृतीचे ऊर्जास्त्रोत आहेत, असे प्रतिपादन शिवदास काळबांडे यांनी केले. आदर्श विद्यालय येथे आयोजित राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्रात माणुसकीचा मळा फुलविण्याचे काम करीत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरोजिनी गट्टानी होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक निशांत हाके यांनी केले, तर सूत्रसंचालन माधव घाळगीर यांनी केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक सोहळा पार पडला. अनिता मनोहरे यांच्या संकल्पनेतून विविध महापुरुषांच्या वेशभूषेतील देखावे आणि प्रेरणादायी गीतनृत्य सादर करण्यात आले. धनश्री गायकवाड (पुणे) हिने शिवचरित्रावर आधारित पोवाडा सादर केला, तर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणारी एकांकिका कार्तिक पुरी याने सादर केली.या सांस्कृतिक सोहळ्यात साहिल साबळे, पल्लवी नांगरे, सुरवी कांबळे, सुशिल चव्हाण, काजल सरोदे आणि अंकिता डंबाळे यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. एस. काळबांडे, गजानन लामदाडे, सत्यम पाटोळे, बापूराव भाळे आणि शिवदास चाटलेवार आदींनी परिश्रम घेतले. राहुल गौंडगावे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.




