देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 24, 2026
in परभणी
0
दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

दिव्यांगांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी, दि.२४ : दिव्यांग मुलांच्या अंगी दडलेल्या असामान्य क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा मिळावी, या उदात्त हेतूने दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समाजाने त्यांच्या सामर्थ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंहं चव्हाण यांनी केले.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग शाळा व कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2026चे उद्घाटन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्त मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यक्रमास दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय डॉ. रविंद्र चव्हाण, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन पक्वान्ने, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रावसाहेब चकोर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लांडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीने नव्हे, तर सन्मानाने पाहण्याची गरज आहे. त्यांच्या सामर्थ्याला योग्य दिशा दिल्यास ते समाजासाठी प्रेरणादायी ठरतील. दिव्यांग भवन उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. श्रीमती नतिशा माथुर म्हणाल्या की, दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा परिषदेच्या 5 टक्के शेष निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना आर्थिक मदत, दैनंदिन दिनचर्या समजत नसलेल्या दिव्यांगांसाठी काळजीवाहक निर्वाह भत्ता, सहायक उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य, विनाअट घरकुल योजना, चालण्यात असमर्थ दिव्यांगांना व्यवसायासाठी ॲडॉप्शनसह स्कूटर उपलब्ध करून देणे, तसेच कौशल्य विकासासाठी अल्पमुदतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे अशा पुनर्वसन व उपजीविकेची साधने निर्माण करणाऱ्या विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय स्पर्धेत ३२ शाळांमधील एकूण ५३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. धावणे, गोळाफेक, लाँग जंप अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भविष्यात नोकरीतील आरक्षणाचा लाभही मिळणार आहे. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, पालक व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी आज जिल्हास्तरावर आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटविला.

Post Views: 1,669
Please Share
Previous Post

राष्ट्रसंत गाडगे महाराज विवेक जागृतीचे ऊर्जास्रोत

Next Post

ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

ज्ञानसाधनाचे १६४ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ