देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 6, 2026
in मराठवाडा
0
ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी
Please Share

सेलूमध्ये महाभारत संदेश कथा, कीर्तनांसह विविध कार्यक्रम; ग्रंथदिंडीवर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील ८७ गावात झालेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सेलू येथील सातोना रोडवरील अलंकापुरी (मयुरी पार्क) भागात ११ मार्च ते १९ मार्च २०२६ या काळातहोत आहे. या सोहळ्याचे आयोजन सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, परतूर आणि मंठा तालुक्यातील भाविकांनी केले आहे. सोहळ्याच्या मंडप उमारणीसह जय्यत तयारी सुरू आहे.

यानिमित्ताने १२ एकर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा होत आहे. यानिमित्ताने अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून १२ मार्चपासून श्री महाभारत संदेश कथा तसेच नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक पंडित महाराज डाके असून, कथेचे यजमान जयप्रकाश विजयकुमार बिहाणी आहेत. या सोहळ्यात पालकमंत्री तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंडप सौजन्य दिले असून, दररोजच्या महाप्रसादाची सेवा सेलू शहर व परिसरातील भाविकांनी घेतली आहे. तर आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चर्सचे रामप्रसाद घोडके यांच्या महाप्रसाद सेवेने सांगता होणार आहे. नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व नगर परिषद टीम पाणी आणि स्वच्छतेसाठी, तर सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सहकार्य करत आहे. अशी माहिती संयोजन समितीने दिली.

आळंदी येथून हेलिकॉप्टरमधून माऊलींच्या अभिषेकयुक्त मूर्तीचे आगमन

या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात ११ मार्च रोजी ग्रंथदिंडीने होणार आहे. विशेष म्हणजे आळंदी येथून हेलिकॉप्टरमधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीचे आगमन आणि ग्रंथदिंडीवर पुष्पवृष्टी केली जाईल. सोहळ्यात नामदेव महाराज चारठाणकर, अनिल महाराज पाटील, मधुसूदन महाराज दैठणकर, बंडा तात्या कराडकर, स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज, ज्ञानेश्वर माउली कदम (मोठे), सोपान महाराज सानप, उमेश महाराज दशरथे, पुरुषोत्तम महाराज पाटील, महादेव महाराज राऊत, विशाल महाराज खोले, संजय महाराज पाचपोर, अच्युत महाराज दस्तापूरकर आणि नामदेव महाराज शास्त्री या दिग्गज कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. १८ मार्च रोजी ज्ञानेश्वर माउली कदम (छोटे) यांचे विशेष प्रवचन होईल, तर १९ मार्च रोजी त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. याबाबत गुरुवारी संयोजन समितीच्या वतीने माहिती देण्यात आली. यावेळी सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. पंडित डाके महाराज, जयप्रकाशजी बिहाणी, दत्तराव पावडे, सुरेंद्र तोषणीवाल, पांडुरंग मगर, जयराम तांगडे महाराज, माधव लोकुलवार, डॉ.शरद कुलकर्णी, विलास पौळ, अविनाश बिहाणी, प्रकाश कुरुंदकर, सुरेश हिवाळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

सेवांसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंडित डाके महाराज यांच्या पुढाकाराने ५ मार्च २०२४ रोजी सेलू तालुक्यातील बोथ येथून फिरता ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात झाली होती. सांगता सोहळ्यात सेलू, मानवत तालुक्यातील १८२ गावांतील तसेच राज्यभरातील २५ हजार भाविक ज्ञानेश्वरी पारायण करणार आहेत. दररोज १० ते १२ गावांमधून जेवणासाठी गोड पदार्थांची सोय केली जाणार आहे.सोहळ्यासाठी विविध ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील नागरिक तसेच ज्ञानेश्वर प्रचारकांचा आणि शेकडो भाविकांचा सोहळ्यातील विविध सेवेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Post Views: 1,948
Please Share
Previous Post

सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा

Next Post

साम्राज्यवादी युद्ध थांबवा, शेतकरी वाचवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साम्राज्यवादी युद्ध थांबवा, शेतकरी वाचवा

साम्राज्यवादी युद्ध थांबवा, शेतकरी वाचवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ