देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील ‘तो’ पंपमालक ‘हुश्शार’ ! बोलतो मराठी, पण कळतं इंग्रजी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 27, 2026
in परभणी
0
सेलूतील ‘तो’ पंपमालक ‘हुश्शार’ ! बोलतो मराठी, पण कळतं इंग्रजी
Please Share

जुन्याच आदेशानुसार करतो विक्री; पुन्हा गर्दीच्या रांगा

परभणी : परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर लावण्यात आलेले इंधन मर्यादेचे निर्बंध जिल्हा प्रशासनाने तातडीने मागे घेतले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी २६.०३.२०२६ रोजी यासंदर्भातील नवीन आदेश निर्गमित केले आहेत.परंतु पहिल्याच आदेशाला दाखवून सेलूतील रेल्वेस्थानकाजवळील पंपचालकाने हुशारीने विक्री सुरू केली आहे. परिणामी अफवा निवळल्या, तरी पुन्हा रांगा, गर्दी वाढत चालली आहे. कहर म्हणजे हा पंपमालक बोलतो चांगली मराठी, पण कळतं त्याला इंग्रजी…सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला फोन केला, तरच आदेश पाळतो, असे त्याच्या बोलण्यात दिसून आले. लेखी आदेश त्याला मान्य नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो. शेवटी त्याची चूक नाही; पण हुश्शारी मात्र कौतुकास्पद आहे. पुन्हा रांगेत या आणि इंधन घ्या, अशी रणनीती त्याने आखली आहे. यामुळे रांगा तिथेच फिरतानाचे चित्र शुक्रवारी, २७ मार्च २०२६ रोजी दुपारी होते.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात मुबलक इंधन साठा उपलब्ध असून अफवांमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. गर्दी मुळे आवक आणि वितरण प्रभावीत झाले आहे. मात्र, आवक नियमित सुरू आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. इंधन विक्री मर्यादा रद्द करण्यात आली असली तरी, वाहनचालकांनी आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे. साठेबाजी करणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिला आहे.

इंधनाचे दर स्थिर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी प्रशासनाने संदर्भीय आदेशान्वये दुचाकी वाहनांसाठी २००/- रुपये आणि तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी २०००/- रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा निश्चित केली होती. मात्र, या निर्णयामुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी वाढली होती. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आधीचे निर्बंध तात्काळ प्रभावाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर गर्दी न करता आवश्यकतेनुसारच इंधन भरून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, पेट्रोल व डिझेल सुट्टे किंवा खुल्‍या स्वरूपात (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात) विक्री न करण्याबाबतचे आदेश मात्र कायम राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Views: 1,049
Please Share
Previous Post

श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

Next Post

रांजणीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रांजणीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव

रांजणीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ