देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 14, 2026
in परभणी
0
श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ
Please Share

पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, सेलूतील साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञास उत्साहात सुरुवात

सेलू : माणसे ज्याचे ध्यान करतात त्याचे गुण माणसात येतात. त्यामुळे जीवन उद्धारक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे. शुद्ध क्रिया, कृती, शब्द, विचार, ध्वनीने मंगलाचरण घडते. संकल्प शक्तीशाली असेल तरच तो सिध्दीस जातो. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले.

श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञास शनिवार, १३ जूनरोजी ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात सुरुवात झाली. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की,” वेदरूपी कल्पतरूला लागलेले रसस्वरूप फळ म्हणजे श्रीमद् भागवत. हा ग्रंथ सर्वांसाठी आहे. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. कोणत्याही गोष्टीतील सार, ज्ञान मिळवण्यासाठी. वारंवार वाचन,अभ्यास, विचार, श्रवण करणे आवश्यक असते. सात्विक आहारातून शुध्द मन बनते. निष्काम भक्ती श्रेष्ठ आहे. लौकीक, धनाची चिंता सोडून जीवनाचा खरा आनंद घ्यायला हवा. विश्वास, श्रध्देने श्रीमद् भागवत कथा श्रवण करणे अधिक लाभदायक ठरते.”
कथेच्या प्रारंभी राहूल शशिकांत कुलकर्णी,अतुल शरद कुलकर्णी यांनी सपत्नीक आरती आणि ग्रंथ पूजन केले. यशवंत चारठाणकर, सच्चिदानंद डाखोरे, शंतनू पाठक, शिवाजीराव पाठक यांनी अभंग गायन केले.सुत्रसंचलन प्रकाश कुरूंदकर यांनी केले. श्रीमद् भागवत कथेस रावसाहेब कुलकर्णी,राजू पाटोदकर, दिलीपराव भिलेगावकर, सुरेशराव जवळेकर, नागनाथराव चारठाणकर, ज्ञानोबाराव बोराडे, जयप्रकाश बिहाणी, शामराव चौधरी, पांडुरंग मगर, रंगनाथराव मोरेगावकर, एकनाथ थोरात, उर्मिला कुलकर्णी, शांताबाई देशपांडे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,516
Please Share
Previous Post

४३ केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला बदल्यांचा नवा आदर्श

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण

जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला बदल्यांचा नवा आदर्श

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ