आस्था आणि आपुलकी सेवाभावी संस्थांच्या वतीने गौरव, विविध स्तरांतून अभिनंदन
सेलू : येथील नूतन विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक राजेंद्र श्रीरंगराव सोनवणे यांना आस्था आणि आपुलकी सेवाभावी संस्थांच्या वतीने ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्काराने’ रविवारी , २६ जुलै रोजी सेलू येथे आयोजित सोहळ्यात गौरविण्यात आले.
माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे आणि शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाणे यांच्या हस्ते सपत्नीक श्री. सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ्यास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, रामराव बोबडे, योगेश ढवारे, जयसिंग शेळके, गुलाब ताठे, डॉ.अशोक नाईकनवरे, उपेंद्र बेल्लुरकर, अमोल निकम आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षकांचा ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने सोमवारी श्री.सोनवणे यांचा अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल श्री.सोनवणे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.





