विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन
जिंतूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवीसाठी पात्र घोषित केले आहे.
विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागाने याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केली.विजय बुधवंत यांनी “Effect of Mutagenic Agents on Productivity and Biochemical Changes in Black Gram (Vigna mungo (L.) Hepper)” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. हा संशोधन प्रबंध इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथील वनस्पतिशास्त्र विभागाचे संशोधन मार्गदर्शक प्रा. (डॉ.) जालिंदर एस. अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या पीएच.डी. मौखिकी परीक्षेच्या निकालाच्या आधारे विजय बुधवंत यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यासाठी पात्र घोषित करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधन यशाबद्दल प्रा. (डॉ.) जालिंदर अंभोरे, डॉ. अरविंद धाबे (वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, सेवानिवृत्त डॉ. प्रभाकर बुधवंत (IPS), Ellora Natural Seeds Pvt. Ltd. चे व्यवस्थापकीय संचालक किशोर वीर, डॉ. मधुकर भालेकर, शिवकुमार ठोंबरे, प्रो.डॉ.अंबादास कदम, संजय कांगणे, डॉ.शंकर सानप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विजय बुधवंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




