देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
in परभणी
0
सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार
Please Share

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला

सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक मनोरंजनाची उत्तम सांगड घातली आहे. मारवाडी गल्लीतील श्री बालाजी मंदिर ट्रस्टच्या श्री रामबाग गणेश मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला असून, मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने साकारलेला थरारक ‘भूत बंगला’ भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

रामबाग गणेश मंडळाने यंदा ७० वर्षांची परंपरा जपत ‘रामबन जंगल सफारी’ हा जिवंत देखावा साकारला आहे. केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता ‘जंगल नष्ट झाले तर जीवन संपेल’ हा पर्यावरण रक्षणाचा विचार यातून मांडण्यात आला आहे. मंडपात अंधारी गुहा, लटकता पूल, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि वन्यजीवांचा अनुभव भाविकांना खिळवून ठेवतो. तीन आठवड्यांच्या परिश्रमानंतर साकारलेल्या या सफारीच्या शेवटी ७ फूट उंच गणेशाचे दर्शन घडते. दररोज सायंकाळी ७ ते १० वेळेत शिस्तबद्ध पद्धतीने देखावे दाखविले जात आहेत. दुसरीकडे, शहरातील प्रतिष्ठित श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने मोंढा परिसरातील गांधी पुतळ्यामागे ‘हॉरर कार्निव्हल-२’ अंतर्गत ‘भूत बंगला’ हा थरारक देखावा उभारला आहे. नावीन्यपूर्ण परंपरा जपत सादर केलेल्या या देखाव्यात ‘जे तुम्ही पाहणार नाही, ते अनुभवणार!’ अशी संकल्पना आहे. आत शिरताच जमीन हलल्याचा भास आणि बाहेर पडण्याचा रस्ता शोधताना होणारी उत्सुकता अंगावर काटा आणते. नागरिकांनी कुटुंबासह या दोन्ही आगळ्यावेगळ्या देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मंडळाचे पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.

फोटो : सेलूतील मारवाडी गल्लीतील श्री बालाजी मंदिर ट्रस्टच्या श्री रामबाग गणेश मंडळाने देखाव्याद्वारेपर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे

फोटो : मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने साकारलेला थरारक ‘भूत बंगला’ भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

फोटो :सेलू शहरातील रायगडचा राजा मित्र मंडळाने १८ फुटी उंच श्रीबालगणेशाची भव्य मूर्ती गणेश भक्तांची आकर्षण ठरली.

फुलारी गल्लीत महाकाल गणेश मंडळाची १५ फुटी उंच मूर्ती लक्षवेधी ठरली आहे.

Post Views: 30
Please Share
Previous Post

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ