देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

वाशिम जिल्हा पोलिस दलातील २४ अधिकारी-अंमलदारांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
in वाशिम
0
वाशिम जिल्हा पोलिस दलातील २४ अधिकारी-अंमलदारांचा गौरव
Please Share

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्कृष्ट, अति-उत्कृष्ट व विशेष सेवा पदक प्रदान

वाशिम (फुलचंद भगत) : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या दीर्घकालीन, निःकलंक व गुणवत्तापूर्ण सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केलेल्या विविध सेवा पदकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांचा स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे १५ ऑगस्ट रोजी आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.

भारत सरकार, गृह मंत्रालयाने पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या दीर्घकालीन निःकलंक सेवेची दखल घेण्यासाठी २३ जुलै २०१८ व २९ सप्टेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनांनुसार ‘उत्कृष्ट सेवा पदक’ तसेच ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्याची तरतूद केली आहे. या पदकांच्या निवडीसाठी संबंधित अधिकारी व अंमलदारांची दीर्घकालीन सेवा, उल्लेखनीय कामगिरी, गुणवत्तापूर्ण सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा आदी बाबींचा विचार केला जातो.महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दीर्घकाळ निःकलंक व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी-अंमलदारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट व अति-उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा या सन्मानाने गौरव करण्यात आला.उत्कृष्ट सेवेबद्दल २० अधिकारी-अंमलदारांचा सन्मानवाशिम जिल्हा पोलिस दलातील खालील अधिकारी व अंमलदारांचा पदक देऊन गौरव करण्यात आला—१) श्री. निकेश खाटमोडे-पाटील (भापोसे), पोलिस अधीक्षक, वाशिम.२) श्री. रामकृष्ण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग वाशिम.३) श्रेणी पोलीस निरीक्षक दिलीप धोडाम, पोलिस मुख्यालय, वाशिम.४) सपोनि/६५७ प्रमोद जाधव, पोलीस ठाणे मंगरुळपीर.५) सपो/७०६ संदीप वानखडे, जिविशा वाशिम.६) सफौ/५७ संतोष कंकाळ, नियंत्रण कक्ष, वाशिम.७) पोहेकॉ/१९१ गजानन अवगडे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम.८) पोहेकॉ/८६२ प्रशांत वक्षी, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम.९) पोहेकॉ/९१६ संतोष पाईकराव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम.१०) मपोहेकॉ/१८७ दिपाली पाटील, पोलिस मुख्यालय, वाशिम.११) पोहेकॉ/५३८ अरविंद राठोड, उपविभागीय कार्यालय, वाशिम.१२) पोहेकॉ/९०४ रामहरी चव्हाळ, पोलीस ठाणे कारंजा ग्रामीण.१३) पोहेकॉ/१०१८ प्रशांत राजगुरू, पोलीस ठाणे रिसोड.१४) पोहेकॉ/९३१ आशिष जैस्वाल, पोलिस मुख्यालय, वाशिम.१५) मपोहेकॉ/११२८ रेश्मा ठाकरे, दहशतवाद विरोधी पथक.१६) पोहेकॉ/८३८ योगेश शर्मा, दहशतवाद विरोधी पथक.१७) पोहेकॉ/७९७ नागेश देशमुख, दहशतवाद विरोधी पथक.१८) पोहेकॉ/११९२ महेश वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम.१९) पोशि/१२९१ अमीर युसुफखान, पोलिस मुख्यालय, वाशिम.२०) पोशि/१३७१ सचिन देशमुख, पोलीस ठाणे वाशिम ग्रामीण.गोंदिया व गडचिरोलीतील नक्षलविरोधी सेवेसाठी विशेष सेवा पदक वाशिम जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी गोंदिया तसेच गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये बजावलेल्या खडतर सेवेसाठीही विशेष गौरव करण्यात आला. या सेवेसाठी वाशिम जिल्ह्यातील चार पोलिस अंमलदारांना ‘विशेष सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.यामध्ये १) पोशि/१११ सईद रेखियावाले, शहर वाहतूक शाखा.२) पोशि/६२५ तेजस खंडारे, जिल्हा विशेष शाखा.३) पोहेकॉ/१०१६ मकरंद घुगे, जिल्हा विशेष शाखा.४) मपोशि/८०९ माया डोंगरे, पोलिस मुख्यालय, वाशिम.या अधिकारी व अंमलदारांनी प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थितीत बजावलेल्या सेवेमुळे त्यांची विशेष दखल घेण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पदके प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.पोलिस दलात आनंदाचे वातावरण कर्तव्यनिष्ठा, दीर्घकालीन सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीची शासनस्तरावर दखल घेत अधिकारी-अंमलदारांना पदकाने सन्मानित करण्यात आल्याने वाशिम जिल्हा पोलिस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सन्मानामुळे पोलिस अधिकारी व अंमलदारांना भविष्यातही अधिक जबाबदारीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने कर्तव्य बजावण्यास प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पदकप्राप्त सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे जिल्ह्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठा वाढली असून, हा सन्मान इतर पोलिस अधिकारी व अंंमलदारांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

Post Views: 1,433
Please Share
Previous Post

परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक

Next Post

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ