देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल

admin by admin
July 30, 2025
in मराठवाडा
0
माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल
Please Share

परभणीत काँग्रेसला मोठे खिंडार, शेकडो समर्थकांसह प्रवेश

परभणी : परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मंगळवार, २९ जुलै रोजी मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश वरपुडकर, त्यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समशेर वरपुडकर आणि स्नुषा प्रेरणा वरपुडकर यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती होती. वरपुडकर कुटुंबीयांसह जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, बाजार समितीचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशा शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात धोंडीराम चव्हाण, देविदास मुलगीर, तुळशीराम सामाले, द्वारकाबाई कांबळे, टी.एम. देशमुख, तुकाराम वाघ, बाळासाहेब रसाळ, शिवाजीराव बेले, संतोष सावंत, रामेश्वर खटिंग, दिलीपराव देशमुख, अजय चव्हाण, प्रमोदराव भोसले, रमेशराव देशमुख, घनश्याम कनके, मुंजाजीराव जवंजाळ, माऊली झाडे, दिलीपराव साळवे, मधुकर लाड, श्रीकृष्ण भोसले, अनिल धोंडगे, बाबासाहेब आवचार, श्रीधरराव देशमुख, प्रणित खजे, सचिन अंबिलवादे, रंगनाथराव भोसले आदींचा समावेश होता. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

Post Views: 1,193
Please Share
Previous Post

श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी

Next Post

अपूर्वा तंत्रनिकेतनचा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग

admin

admin

Next Post
अपूर्वा तंत्रनिकेतनचा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग

अपूर्वा तंत्रनिकेतनचा वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ