देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

admin by admin
August 2, 2025
in परभणी
0
लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
Please Share

: पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन, परभणीत महसूल सप्ताहाचे उद्घाटन

परभणी : महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवारी केले. महसूल दिन आणि महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवावे. महसूल कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांची सेवा करण्याची उत्तम संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या संकल्पनेत सहभागी होऊन परभणी जिल्ह्याला विकासात अग्रेसर करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. श्रीमती ढालकरी यांनी प्रास्ताविकात प्रशासनाच्या मागील वर्षातील कामांचा आढावा सादर केला. यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी :
परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महसूल सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, डॉ.प्रताप काळे, रविंद्र सिंह परदेशी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

पूर्ण…

Post Views: 1,214
Please Share
Previous Post

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post

अण्णा भाऊ साठे यांना लहुजी साळवे महासंघाचे अभिवादन

admin

admin

Next Post
सेलू येथे जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण

अण्णा भाऊ साठे यांना लहुजी साळवे महासंघाचे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ