सेलू : सेलू श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तन्वी सोमानी आणि क्षितिजा खजिने या दोन विद्यार्थिनींच्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तन्वी सोमानी हिची मुंबईतील नामांकित गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये निवड झाली आहे. तर क्षितिजा खजिने हिने वर्धमान महावीर या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, पालकांची उपस्थिती होती.
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...





