देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका
Please Share


पालकमंत्री मेघना बोर्डीकर : स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा

परभणी, दि. १९ : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. आपल्या परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती आहे. सेलू तालुक्यातील मौजे राजवाडी येथील दुधना नदीवर असलेल्या पुलावर जी दुर्घटना घडली ती दुर्दैवी आहे, प्रशासन वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहे. सर्व जनतेला विनंती की, पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका. प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

आज सायंकाळी ५.०० वा. सुमारास मौजे राजवाडी तालुका सेलू, जि. परभणी येथे दुधना नदीवर असलेल्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे छबुराव श्रीरंगराव जावळे वय अंदाजे ४५ वर्षे राहणार गुळखंड व मारुती रामभाऊ हरकळ वय अंदाजे ५० वर्षे राहणार वालूर हे २ नागरिक मोटरसायकलने प्रवास करीत असताना पाण्यात वाहून गेले असल्याची घटना घडली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासन वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहे.

परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणे, ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प इत्यादी पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा व दुधना आणि सदर न‌द्यांच्या उपनद्या, ओढे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत नागरिकांनी पर्यटन स्थळे, नदीकाठ व रस्त्यावरून पाणी वाहत असेल अशा ठिकाणाहून धोकादायकरित्या प्रवास करणे टाळावे, स्थानिक पोलिस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता निश्चित करणे आदीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२–२२६४००, टोल फ्री क्रमांक १०७७, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मो. ९९७५०१३७२६ या क्रमांकावर संपर्क करावा.

मुसळधार पावसाने शेतकरी बांधवांचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिला आहे.

Post Views: 1,161
Please Share
Previous Post

दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

Next Post

रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे

रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ