देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचा उत्साह

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 20, 2025
in परभणी, मराठवाडा
0
कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Please Share

कला आणि क्रीडा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक : कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव तसेच क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या हस्ते दिनांक १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील दीक्षांत सभागृहात झाले. या वेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने विद्यापीठात उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.

उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. अशा महोत्सवांमधून विद्यार्थ्यांची प्रतिभा फुलते आणि त्यांना आत्मविश्वास, सर्जनशीलता व नेतृत्वगुणांची प्रेरणा मिळते.

युवक महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या “फाइन आर्ट्स” कला प्रकारातील स्पर्धा दिनांक १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधील ३० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कृषि महाविद्यालय, परभणी, लातूर, आष्टी (के. एस. के. बीड), कांचनवाडी, अन्न तंत्र महाविद्यालय परभणी, राजीव गांधी अन्न तंत्र महाविद्यालय परभणी, पी. जी. आय. ए. बी. एम. चाकूर तसेच इतर संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे मनोहारी सादरीकरण केले.

या स्पर्धा एकूण ६ कला प्रकारांमध्ये झाल्या. यात पोस्टर पेंटिंग, ऑन द स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, रांगोळी आणि कार्टूनिंग यांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि रंगांची जादू साकारून परीक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांनी सहकार्य केले, तर विद्यापीठाच्या फाइन आर्ट्स प्रभारी अमोल सोनकांबळे यांनी सर्व स्पर्धांचे प्रभावी समन्वयन केले. या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेतच नव्हे, तर एकमेकांशी संवाद साधून, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करून, कला, क्रीडा आणि संस्कृतीचे अद्वितीय मिश्रण अनुभवले

Post Views: 1,189
Please Share
Previous Post

रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे

Next Post

वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना

वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ