देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2025
in परभणी
0
नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप
Please Share

शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत मिळवून दिल्याचे रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम गुरुवारी (दिनांक २८) रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, आणि महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी रघुनाथ गावडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, हा कार्यक्रम खूप भावपूर्ण आहे. शासकीय सेवेत काम करत असताना अनेक ऋणानुबंध निर्माण होतात. गावडे आणि माझी ओळख शासकीय सेवेत येण्यापूर्वीची असून आम्ही चांगले मित्र आहोत. गावडे यांनी नाशिक कुंभमेळ्यात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे आतापर्यंतचे प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आहे.

रघुनाथ गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत दोन ‘ट्रिगर’ लागू करण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळवून दिली. याच काळात ‘शासन आपल्या दारी’, ‘महासंस्कृती’, ‘महानाट्य’, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पूर्ण करता आल्या. परभणी जिल्हा कायम माझ्या स्मरणात राहील, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, गावडे यांच्या दोन वर्षांच्या काळातील अनुभव पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिपराज डापकर, शैलेश लाहोटी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, राजेश सरोदे, महसूल संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप राजपुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रवीण वायकोस यांनी केले.

Post Views: 1,279
Please Share
Previous Post

मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले

Next Post

कापूस आयात शुल्कमाफी मुदतवाढीने शेतकऱ्यांवर अन्याय

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

कापूस आयात शुल्कमाफी मुदतवाढीने शेतकऱ्यांवर अन्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ