देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2025
in परभणी, मराठवाडा
0
मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखन समृद्ध केले
Please Share

सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमालेत पक्षनिरीक्षक माणिक पुरी यांचे प्रतिपादन

सेलू जि.परभणी : मराठी साहित्यविश्वात निसर्गावर ललित लेखन करून त्याला एक वेगळा सन्मान मिळवून देणारे लेखक म्हणजे पद्मश्री अरण्यॠषी मारुती चितमपल्ली आहेत. त्यांनी आयुष्यातील एक तृतीयांश वेळ जंगलसाधना आणि संशोधन करून हे लेखन करत निसर्गविषयक लेखन समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले आहे, असे मत पक्षी निरीक्षक आणि निसर्गलेखक माणिक पुरी यांनी व्यक्त केले

सेलू येथील नूतन विद्यालयात आयोजित ६४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ते बोलत होते. “पद्मश्री अरण्यॠषी मारुती चितमपल्ली ” हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे होते, तर माणिक पुरी आणि आदर्श शिक्षक माधव गव्हाणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याविषयी बोलताना माणिक पुरी म्हणाले की, वनविभागात नोकरी करत असताना त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. जागतिक पक्षीतज्ञ डॉ.सलीम अली यांच्या सहवासातून त्यांच्या या निरीक्षणाला आणि संशोधनाला योग्य दिशा मिळाली. प्रा.नरहर कुरुंदकर आणि गो. नी. दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही संशोधने ललित स्वरूपात लिहिली. त्यांच्या या साहित्यनिर्मितीमुळे महाराष्ट्राला निसर्ग आणि पक्ष्यांवर संशोधन करून लिहिणारा एक उत्कृष्ट लेखक मिळाला. त्यांनी १७ लेखसंग्रह, एक पक्षीकोश आणि ‘मृग-पक्षीशास्त्र’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून वाचकांसाठी प्रचंड साहित्य निर्माण केले आहे.

माधव गव्हाणे यांनी ‘जंगलाचं देणं’ या पुस्तकाचा संदर्भ देत मारुती चितमपल्ली यांनी गाव-खेड्यांच्या आसपास आढळणाऱ्या चिंचेच्या झाडांचे विशद केलेले महत्त्व पटवून दिले. केवळ चिंचेचेच नव्हे तर पिंपळ, वड आणि कडूलिंब यांसारखी झाडे गावांची शोभा होती. मात्र, काळानुसार ही झाडे नष्ट केली जात असल्याने जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात विजय ढाकणे यांनी, पक्षीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मारुती चितमपल्ली यांनी विविध संस्कृत आणि पाश्चात्त्य भाषा शिकल्या, यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर आणि मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपेंद्र बेल्लूरकर यांनी केले, तर संयोजक संजय विटेकर, सहसंयोजक जी.ए.गुंजकर, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, अजित मंडलिक आणि बाळू बुधवंत यांनी सहकार्य केले.

Post Views: 1,417
Please Share
Previous Post

महावितरणच्या रस्त्याची दैना; अभियंता कार्यालयही कुलूप बंद‌ !

Next Post

नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप

नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ