देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कापूस आयात शुल्कमाफी मुदतवाढीने शेतकऱ्यांवर अन्याय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2025
in राष्ट्रीय
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

संयुक्त किसान मोर्चाचे राज्यभर आंदोलन; खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कमाफीची मुदत ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत वाढवल्याने संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) तीव्र विरोध दर्शवला आहे. मोदी सरकार आणि नोकरशाहीने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करत, एसकेएमने देशभरातील शेतकऱ्यांना १, २, ३ सप्टेंबर रोजी शुल्कमाफी अधिसूचनेची प्रत जाळून निदर्शने करण्याचे तसेच, कापूस उत्पादक शेतकरी आपापल्या खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही २९ ऑगस्टरोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानिकारक

एसकेएमने म्हटले आहे की, निर्यात संकटाचे कारण पुढे करून मक्तेदार व्यापारी आणि उद्योजक कापूस शेतकऱ्यांची लूट करत आहेत. कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असतानाही अर्थ मंत्रालयाने ही शुल्कमाफी वाढवली आहे. ऑक्टोबरपासून कापणीचा हंगाम सुरू होणार असल्याने हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अधिक हानिकारक ठरेल. बेलगाम आयात देशांतर्गत कापसाच्या किमती दाबण्यासाठीच आहे, असा आरोपही एसकेएमने केला आहे. गेल्या ११ वर्षांत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) देशांतर्गत उत्पादनापैकी १३% पेक्षा कमी कापूस खरेदी करत आहे, त्यामुळे ८७% शेतकऱ्यांना कच्चा कापूस खुल्या बाजारात कमी किमतीत विकावा लागत आहे.

देशभर तीव्र आंदोलनाचा इशारा

केंद्र सरकारची ही कृती संपूर्ण शेतकरी समुदायाचा अपमान असल्याचे एसकेएमने म्हटले आहे. सरकारने असे शेतकरीविरोधी निर्णय मागे न घेतल्यास अमेरिकेच्या दबावाखाली इतर पिकांसाठीही असेच निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, एसकेएमने सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले आहे. कापूस उत्पादक शेतकरी आपापल्या खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढतील आणि त्याची तारीख राज्यस्तरीय एसकेएम नेतृत्वाद्वारे ठरवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आधारभूत किंमत नाकारल्याने कोट्यवधींचे नुकसान

२०२४ मध्ये भारतातील कापड आणि कपड्यांचा उद्योग १५,१३,८५० कोटी रुपयांचा होता, त्यापैकी देशांतर्गत बाजार १२,३४,४०० कोटी रुपयांचा होता. निर्यात ३,२१,९०० कोटी रुपयांची असून, अमेरिकेतील निर्यात केवळ २०,९८४ कोटी रुपयांची आहे. या तुलनेत प्रति क्विंटल १०,०७५ रुपये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नाकारल्यामुळे ६० लाख कापूस शेतकऱ्यांचे अंदाजे १८,८५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एसकेएमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, देशातील लोकांची क्रयशक्ती वाढवणे हाच निर्यात संकटावर मात करण्याचा उपाय आहे. शेतकऱ्यांना सी टू +५०% या फायदेशीर एमएसपीनुसार दर आणि कामगारांना किमान जगण्याची हमी देणारे वेतन मिळाल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे होईल. सरकारने कापड क्षेत्राच्या प्रोत्साहनाच्या नावाखाली उद्योजकांसाठी स्वस्त आयातीला परवानगी देऊ नये, अशी मागणीही पत्रकात करण्यात आली आहे.

Post Views: 1,198
Please Share
Previous Post

नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत, तर रघुनाथ गावडे यांना निरोप

Next Post

शेतीचे भविष्य मिश्र फळबागेतच

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतीचे भविष्य मिश्र फळबागेतच

शेतीचे भविष्य मिश्र फळबागेतच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ