देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2025
in परभणी
0
साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा
Please Share

सेलूत नूतन विद्यालयाच्या १९७२ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात, शाळेच्या स्वागताने भारावले सारे

नूतन विद्यालय संस्काराचे विद्यापीठ : श्याम मणियार

सेलूचे नूतन विद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असून आम्ही त्या शाळेचा अंश असल्याचा आम्हाला अभिमान आहे. समर्पण, त्याग, निष्ठा, देशभक्तीचे संस्कार प्रशालेने आमच्यावरती केल्यामुळेच आम्ही आज आमच्या जीवनात स्वाभिमानाने उभे आहोत. अशी भावना माझी विद्यार्थी श्याम मणियार यांनी व्यक्त केली.

सेलू जि.परभणी :  सेलू येथील नूतन विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या १९७२ च्या बॅचचा स्नेहमेळावा शनिवारी आणि रविवारी (१३ आणि १४ सप्टेंबर) श्री बालाजी मंदिरच्या सिंदूर सभागृहात उत्साहार पार पडला. आज वयाची सत्तरी ओलांडलेल्या ५९ वर्गमित्र-मैत्रिणांचा हा मेळा तब्बल अर्ध्या शतकानंतर (५३ वर्ष) जमला होता. यामध्ये ३३ जणांनी सपत्नीक सहभाग घेतला.
शनिवारी दिवंगत मुख्याध्यापक आणि सेलूभूषण शंकरराव मंडलिक गुरुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. संयोजन समितीप्रमुख माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, आरबी घोडके इन्फ्रास्ट्रकचरचे संचालक उद्योजक रामप्रसाद घोडके, ज्ञानेश्वर सोळंके, श्याम मणियार, मुजीब घोरी, डॉ.सुभाष परतानी, रमा सोमैय्या, माणिक रोडगे, डॉ. ईश्र्वरचंद्र हुरकट यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात मनोगतातून दहावीनंतर प्रवास मांडतांना शाळेचे संस्कार, गुरूजनांविषयीचा आदर, शाळेविषयी अभिमान विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आणि मैत्रीच्या मौल्यवान नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वागतपर मनोगत श्री.आडळकर, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भगवान टेकाळे यांनी केले. पुष्पा झंवर यांनी आभार यांनी मानले. कार्यक्रमस्थळी दिवंगत गुरूजन तसेच वर्गमित्रांचे छायाचित्र प्रदर्शित करून अभिवादन केले

सायंकाळी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर करून मने जिंकली. रात्री संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर, गिरीश दीक्षित, दीपक देवा, मनीषा पांडे आणि स्वाती तांबे यांच्यासह गौतम सूर्यवंशी आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने सादर झालेला गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम उशीरापर्यंत रंगला. रविवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी गुरूजनांचा तसेच माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पी.एम.रोडगे, डी.के.देशपांडे तसेच माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, रामप्रसाद घोडके, प्रा.भगवान टेकाळे, श्यामसुंदर मणियार, डॅा.सुभाष परताणी, श्रीकांत दिक्षित, सतिश टाक, मुजीब घोरी, नंदकिशोर राजूरकर, मधुकर तावरे, पांडुरंगराव मगर, प्रकाश धामणगावकर , शरयू मुळावेकर, मधुकर कव्हळे, विठ्ठल गायकवाड, सतीश पांडे, माणिक रोडगे, गौतम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे, रामकिशन शेरे, प्रकाश भरड, प्रा.प्रकाश कुरूंदकर, रामराव लाडाणे, श्री बालाजी मंदिर ट्रस्ट, साईबाबा बॅंकचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व माजी विद्यार्थी आणि संयोजन समितीने पुढाकार घेतला.

शाळेच्या स्वागताने भारावले सारे…

रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी माजी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा म्हणत शालेय आठवणी जागविल्या. शाळेच्या वतीने प्रवेशव्दारावरच पुष्पवृष्टीकरून वाजत गाजत तसेच शालेय दैनंदिनी, स्मृतिगंध सन्मानपत्र, गुलाब पुष्प आणि औक्षणाने केलेल्या स्वागताने माजी विद्यार्थी भारावून गेले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, अजिजखाँ पठाण, राजेश गुप्ता, पी.एम.रोडगे, प्रकाश पांडव, हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील, उल्हास पांडे यांची उपस्थिती होती. श्याम मणियार आणि डॉ.सुभाष परताणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य कोठेकर यांनी मार्गदर्शन केेले. डॉ.लोया यांनी समारोप केला. सूत्रसंचालन डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. तर डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post Views: 1,339
Please Share
Previous Post

मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

Next Post

पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू

पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ