घनसावंगी : तालुक्यातील रांजणी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने, सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी या थोर नेत्यांच्या कार्याबद्दल आणि जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सचिन पाटोळे, निवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार खुळे यांच्यासह विजय कांबळे, रणजीत डोळझाके, मुनाफ कुरेशी, शेख सलाम, नंदकिशोर पाटोळे, तुकाराम पाटोळे, भागवत पाटोळे, विशाल जाधव, आणि विष्णू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी
कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...





