देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गंगाखेडात अपप्रवृत्ती पुतळ्याचे विसर्जन !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 3, 2025
in परभणी
0
गंगाखेडात अपप्रवृत्ती पुतळ्याचे विसर्जन !
Please Share

महापुरामुळे दहन कार्यक्रम रद्द; आ. गुट्टे यांच्या हस्ते विसर्जन

गंगाखेड : सर्वत्र झालेली अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेला महापूर या संकटामुळे गंगाखेड येथे अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्याऐवजी चक्क गोदावरीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. साई सेवा प्रतिष्ठानने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. “जास्त पावसामुळे यावेळी रावणाला जाळण्याऐवजी बुडवावा लागेल” अशा आशयाचे समाजमाध्यमांवर गाजत असलेले विडंबन गंगाखेडमध्ये प्रत्यक्षात उतरल्याचे बघायला मिळाले.

कार्यक्रमाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

गंगाखेडच्या दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अपप्रवृत्ती पुतळा दहन, आतषबाजी, गुणवंत गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे २५ वे वर्ष होते. गोदावरीला आलेल्या महापूरामुळे सुरुवातीला कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आले. परंतु, दुसऱ्या ठिकाणीही पुराचे पाणी शिरले आणि शहराची परिस्थितीही गंभीर बनत चालली होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन, आयोजकांनी सर्व उत्सवी कार्यक्रमांना फाटा देत, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला.

मान्यवरांच्या उपस्थितीत विसर्जन

उत्सवी कार्यक्रम रद्द करून केवळ अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन करण्याऐवजी गोदावरीत विसर्जन करण्यात आले. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या हस्ते पुतळा विसर्जित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते गोपालदास तापडिया, माजी जि. प. सदस्य किशनराव भोसले, तालुका संघाचे मुख्य प्रशासक गंगाधर पवार, संचालक प्रमोद साळवे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले, संचालक आळसे मामा, बालाजी मुंडे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, राजू दामा, दिपक तापडिया, राजू पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी, अनिलसेठ यानपल्लेवार आदींची उपस्थिती होती.

…यांनी घेतला पुढाकार

साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक गोविंद यादव, नागेश पैठणकर, मनोज नाव्हेकर, रमेश औसेकर, गुंडेराव देशपांडे, नंदकुमार भरड, गजानन महाजन, अंबादास राठोड, जुगल तोतला, अनंत मुंडे, राजू जवादे, विष्णू अनावडे, नारायण घनवटे, माधवराव चव्हाण आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास देशमाने, व्यंकटेश यादव, संजय सोनटक्के, किरण यादव, परसराम गिराम, प्रथम यादव, अक्षय मेहत्रे, अथर्व महाजन आदींसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,257
Please Share
Previous Post

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

Next Post

केंद्राकडून राज्याला ६ हजार कोटी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
केंद्राकडून राज्याला ६ हजार कोटी

केंद्राकडून राज्याला ६ हजार कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ