दीपावलीनिमित्त विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम
सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दीपावली सणानिमित्त आकर्षक आकाशकंदील तयार केले. कार्यानुभव विषयाअंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या नवनिर्मिती क्षमतेचा विकास करण्यासाठी स्वनिर्मित आकाशकंदील तयार करण्याचा हा उपक्रम सौ. रागिणी जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींचे कौतुक स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे, शंकर राऊत आणि अनिल कौसडीकर आदींनी केले.





