सेलूत विविध शाळांचा सहभाग, ‘वंदे मातरम’ नाटिकेने वेधले लक्ष
सेलू : सेलू येथील नूतन विद्यालयात महर्षि वाल्मिकी शासकीय औद्योगिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सार्धशताब्दी कार्यक्रम शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम् ‘ नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध शाळा , महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर यांच्यासह ‘ वंदे मातरम् ‘ चे सामूहिक गायन केले.
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम.लोया होते तर. प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद कराड यांची उपस्थिती होती. नायब तहसीलदार विजय मोरे, पोलिस उपनिरीक्षक दिगांबर दहिफळे, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, प्राचार्य अशोक बोडखे, गटविकास अधिकारी उदय जाधव, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, रेवणअप्पा साळेगावकर, प्रभारी गटनिदेशक बालजी वळसे, सदस्य रमाताई शेजावळे, शितल सोळंके यांची उपस्थिती होती. ‘वंदे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणास्त्रोत आहे. गीताचे शब्द प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित करतात. विद्यार्थ्यांनी या गीतामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊन ते आचरणात आणावे, असे आवाहन प्रमोद कराड यांनी केले.
सहशिक्षक डॉ. सुरेश हिवाळे आणि शिल्पा बरडे यांनी दिग्दर्शित केलेली ‘ वंदे मातरम ‘ ही नाटिका प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सादर केली. या नाटिकेत सान्वी हेलसकर, मृण्मयी इक्कर, शब्दा लाटकर, श्रीराम खिस्ते, मोक्षदा कडगे, उत्तरा लोंढे, समृद्धी डमरे, श्रेया उपासे, राजवीर खेडेकर, श्रेयस लिंगायत या बाल कलाकारांनाचा सहभाग होता. नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड, संध्या फुलपगार यांनी केले. तर आभार पवन जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष काचगुंडे, सुधाकर कासार, सविता गादेवार, अमोल कांबळे, माधवी सातारकर यांनी परिश्रम घेतले.





