देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा : सेलू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 5, 2025
in परभणी
0
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा : सेलू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

The judge's gavel and scales as a symbol of the judiciary and justice.

Please Share

आरोपीला १ महिन्याचा कारावास आणि धनादेशाच्या दुप्पट ₹ १,१६,२०० नुकसान भरपाईचे निर्देश

सेलू : धनादेश अनादर प्रकरणी सेलू येथील सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश श्री. वैभव आर. गटकळ यांनी शेख नासेर शेख नबी या आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. आरोपीस धनादेश अनादराबद्दल १ महिन्याचा साधा कारावास तसेच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम, म्हणजेच ₹ १,१६,२०० (एक लाख सोळा हजार दोनशे रुपये), आणि प्रकरणाचा खर्च म्हणून फिर्यादी बँकेस ₹ १०,००० (दहा हजार रुपये) १ महिन्यात देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिनांक १६.१०.२०२५ रोजी पारित केला आहे.

याबाबतची हकीकत अशी आहे की, सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद शाखा यांच्याकडून आरोपी शेख नासेर शेख नबी यांनी घेतलेली रक्कम परतफेड केली नव्हती. बँकेने वसुलीसाठी पाठपुरावा केल्यानंतर आरोपीने बाकी रकमेपैकी ₹ ५८,२०० (अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयांचा) धनादेश बँकेच्या हक्कात दिला. सदरील धनादेश बँकेने वटविण्यासाठी दिला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो धनादेश अनादर झाला.

त्यानंतर बँकेच्या वकिलामार्फत कायदेशीरपणे रक्कम मिळण्यासाठी आरोपीस नोटीस पाठवण्यात आली. नोटीस देऊनही मुदतीत रक्कम न दिल्यामुळे बँकेतर्फे धनादेश अनादराबद्दल Negotiable Instruments Act (निगोशिएरबल इन्स्ट्रुमेंट कायदा) च्या कलम १३८ अन्वये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सेलू येथे प्रकरण दाखल करण्यात आले होते. वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस धनादेश अनादर झाल्याबद्दल प्रकरण सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जर उपरोक्त रक्कम १ महिन्यात न दिल्यास, १ महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. फिर्यादी देवगिरी नागरी बँक, औरंगाबाद शाखा, सेलूच्या वतीने ॲड. एल. एच. खोना यांनी यशस्वीरित्या बाजू मांडली.

Post Views: 1,135
Please Share
Previous Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत

Next Post

वंदे मातरम् सामूहिक गायन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वंदे मातरम् सामूहिक गायन उत्साहात

वंदे मातरम् सामूहिक गायन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ