सेलू : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेलू शहरात त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमास सेलू शहरातील भारतीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर आगामी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील उमेदवारदेखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महामानवाला वंदन करून त्यांच्या विचारांवर आधारित समाज घडवण्याचा संकल्प केला.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





