देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पोस्टाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 15, 2026
in परभणी, मराठवाडा
0
पोस्टाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
Please Share

डाक अधीक्षक डॉ.संजय लिये यांचे आवाहन, जिंतूर शहरात ग्रामीण डाक सेवक प्रशिक्षण मेळावा उत्साहात

जिंतूर/प्रतिनिधी : शहरातील शकुंतला बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १४ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण डाक सेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना परभणी विभागाचे डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी सर्व नागरिकांनी भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या प्रशिक्षण मेळाव्यासाठी जिंतूर, मंठा, येलदरी, बोरी, झरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव उपडाकघरांच्या अंतर्गत येणारे ८० शाखा डाकपाल व उपडाकपाल उपस्थित होते. कार्यक्रमास परभणीचे डाक अधीक्षक डॉ. संजय लिये, जिंतूर उपविभागाचे डाक निरीक्षक बालासाहेब शिंदे, जिंतूरचे पोस्ट मास्तर शेख इर्शाद, राजेश दुकानदार, अभिजीत जोशी आणि भगवान वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाक विभागाच्या वतीने एपीटी २.०, पीओएसबी योजना, स्पीड पोस्ट, पार्सल आणि आरएसबीटी सेल अंतर्गत ग्रामीण डाक सेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. लिये यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यालयात टपाल विभागाच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी टपाल विभागाच्या बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा, मुदत ठेव खाते (टीडी), आवर्ती बचत खाते (आरडी), राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणारे शासकीय अनुदान, एटीएम, चेक बुक आणि नेट बँकिंग या सुविधांचाही वापर करावा. पेमेंट बँकेच्या माध्यमातून फोन पे आणि युपीआय सेवा उपलब्ध असून नागरिकांनी जास्तीत जास्त खाती उघडावीत व पार्सल सुविधेचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये राजेश दुकानदार, आशेक सांगळे, घनशाम भांगे, राजेंद्र तुरे आणि सोपान केंद्रे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा टपाल विभागाची बॅग देऊन गौरव करण्यात आला.

नेमगिरी संस्थानास दिनदर्शिका वाटपजिंतूर येथील प्रसिद्ध नेमगिरी संस्थान येथे टपाल विभागाच्या वतीने भेट देऊन विविध योजनांची माहिती असलेली २०२६ ची दिनदर्शिका आणि राम जन्मभूमी स्मृतिचिन्ह संस्थेच्या विश्वस्तांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. संजय लिये, बालासाहेब शिंदे, राजेश दुकानदार आणि मंचक जगताप यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,709
Please Share
Previous Post

सेलूच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे

Next Post

विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

विश्वास वसेकर यांच्या 'अहल्या' कवितासंग्रहाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ