देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खून, दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 18, 2026
in परभणी
0
खून, दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक
Please Share

स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचून केली कारवाई

सेलू : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपूर्वी जबरी चोरी, दरोडा आणि खून अशा गंभीर घटना तसेच सेलू तालुक्यातील वालूर येथे आणि चारठाणा (ता. जिंतूर) व परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी शुक्रवारी (दि. १६) परभणी तालुक्यातील झरी येथून शिताफिने ताब्यात घेतले.

वालूर (ता. सेलू) येथील बोरी रस्त्यावर शेतातील श्री कृष्ण मंदिरात झोपलेल्या दत्तराव भोकरे- सरूबाई भोकरे या वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण करून याच परिसरातील शेत आखाड्यावर झोपलेल्या संतोष आसाराम सोनवणे (वय २४ वर्ष) या तरूणाच्या डोक्यात मारहाण करून ठार मारल्याचे घटना २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी मयताचे वडील आसाराम रानबा सोनवणे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसांत खूनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभिर्यओळखून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे पथके स्थापन करून रवाना केली होती. या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील झरी येथे घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून सखोल माहिती प्राप्त केली. तसेच तांत्रिक तपास, आरोपीची अंगकाठी, गुन्हा करण्याची पद्धती याचा सखोल अभ्यास करून गोपनीय माहिती संकलित केली.

मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेने आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पबार (रा. पिटोरी शिरसगाव ता. अंबड जि. जालना) आणि त्याचे दोन
साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गुरुवारी (ता. १५) मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी बाबुराव उर्फ बाबूशा सावळा पवार (वय ६०) यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे सखोल चौकशी केली असता त्याने सेलू, परभणी ग्रामीण आणि चारठाणा पोलिस ठाणे येथे दाखल विविध गुन्ह्यांची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस आमदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, केशव लटपटे, रणजीत आगळे, रंगनाथ दुधाटे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर आणि गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.

Post Views: 1,678
Please Share
Previous Post

सेलू रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

Next Post

मानवतेच्या रक्षणासाठी ‘हिंद की चादर’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मानवतेच्या रक्षणासाठी ‘हिंद की चादर’

मानवतेच्या रक्षणासाठी ‘हिंद की चादर’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

नूतन विद्यालयाच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा रंगला सेलू : काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या, आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी...

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

एसकेएमचे राष्ट्रपतींना मागण्यांचे पत्र परभणी : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि केंद्रीय ट्रेड युनियनच्या आवाहनावरून १० ऑगस्ट २०२६ रोजी भारत...

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

मंगरुळपीर शहरात रस्त्यांवर भीतीचे वातावरण व अपघाताचा धोका; नगरपालिकेकडे तातडीने बंदोबस्त करण्याची निवेदनाद्वारे मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : शहरातील विविध...

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल  राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

१२५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन सेलू : येथील एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ