देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निःस्वार्थ कार्य कायम स्मरणात राहते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 6, 2026
in परभणी
0
निःस्वार्थ कार्य कायम स्मरणात राहते
Please Share

अक्रूर महाराज साखरे यांचे प्रतिपादन, पांगरी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सेवेला भाविकांची मोठी गर्दी

जिंतूर : समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्तीच समाजाच्या स्मरणात कायम राहते. संत परंपरेने दिलेला सदाचार, भक्ती आणि मानवतेचा वारसा पुढे नेण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन अक्रूर महाराज साखरे यांनी केले.

पांगरी (ता. जिंतूर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या कीर्तन सेवेत ते बोलत होते.संत निळोबाराय यांच्या अभंगाचा संदर्भ देत त्यांनी भक्ती आणि परोपकाराचे महत्त्व विषद केले. देवाला कर्मकांडापेक्षा भक्ताचे शुद्ध प्रेम आणि निस्वार्थ सेवा प्रिय असते. ज्या व्यक्तीच्या मनात दृढ श्रद्धा आणि सकारात्मक विचार असतो, त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो, असे त्यांनी “भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती” या ओळींचे स्पष्टीकरण देताना सांगितले. देव केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून तो भक्ताच्या शुद्ध भावनेत आणि दैनंदिन जीवनात वास करतो, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.समाजप्रबोधन करताना अक्रूर महाराज साखरे यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवरही भाष्य केले. इतरांच्या यशावर जळण्याऐवजी त्यांच्या चांगुलपणाचे कौतुक करण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्त्री भ्रूणहत्येसारख्या प्रथांना आळा घालून समाजात समानतेचा विचार रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या कीर्तन सोहळ्याला पांगरी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,045
Please Share
Previous Post

” भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय “

Next Post

कार्यरत शिक्षकांना टीईटीतून वगळा; जुनी पेन्शन लागू करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कार्यरत शिक्षकांना टीईटीतून वगळा; जुनी पेन्शन लागू करा

कार्यरत शिक्षकांना टीईटीतून वगळा; जुनी पेन्शन लागू करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ