देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

” भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय “

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 6, 2026
in परभणी, मराठवाडा
0
" भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय "
Please Share

कबुलीसाठी कार्यकर्त्याला धमकी, मारहाणप्रकरणी चार आरोपीविरूद्ध गुन्हा

सेलू : भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून एका तरुण शेतकरी कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना सेलू तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


सेलू पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीनिवास दत्तात्रय गाडेकर (वय ३७, रा. रायपूर, हल्ली मुक्काम शास्त्रीनगर, सेलू) हे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राधे धामणगाव पाटीजवळून जात होते. यावेळी आरोपी नामदेव उर्फ आप्पा डख आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. ‘तू भाजप पक्षाच्या प्रचारासाठी पैसे वाटत आहेस’ असा आरोप करत आरोपींनी गाडेकर यांना जबरदस्तीने गाडीत बसवले.
आरोपींनी गाडेकर यांना खवणे पिंपरी येथे नेऊन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, ‘तू मेघना बोर्डीकर यांचा अपप्रचार कर आणि भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय असे कॅमेऱ्यासमोर कबूल कर, नाहीतर तुला खतम करून टाकू’ अशी धमकी दिली. आरोपींनी भीती दाखवून गाडेकर यांच्याकडून तसे वदवून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच निवडणूक विभागाचे एफएसटी (स्थिर सर्वेक्षण पथक) खवणे पिंपरी येथे पोहोचले. पथकातील कर्मचाऱ्यांनी फिर्यादीची सुटका करून त्यांना पुन्हा राधे धामणगाव येथे आणले. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून गाडेकर यांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस २०२३ च्या कलम १४०(३), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंगळे करत आहेत.

पैसे वाटप कबुलीच्या व्हायरल व्हिडिओची चर्चा

सेलू : तालुक्यातील देऊळगाव जिल्हा परिषद गटातील राधेधामणगाव येथे गुरुवारी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांना प्रत्येकी १ हजार रुपये वाटले जात असताना एका व्यक्तीला नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या घटनेचा आणि पैसे वाटप करणाऱ्याने दिलेल्या कबुलीचा व्हीडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि मिळालेल्या माहितीनुसार, पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळताच नामदेव डख आणि इतर नागरिकांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत आणि पोलीस कर्मचारीही त्या ठिकाणी उपस्थित होते. नागरिकांनी पकडलेल्या व्यक्तीने आपले नाव श्रीनिवास दत्तात्रय गाडेकर असल्याचे सांगितले. आपण बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचे कर्मचारी असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सांगण्यावरून हे पैसे वाटप करत असल्याची कबुली या व्यक्तीने उपस्थितांसमोर दिली, असे व्हायरल व्हिडिओत दिसून येते. या कारवाईदरम्यान इतर ३ जण घटनास्थळावरून फरार झाल्याचेही पुढे आल्याची चर्चा होती.

Post Views: 1,019
Please Share
Previous Post

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

Next Post

निःस्वार्थ कार्य कायम स्मरणात राहते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
निःस्वार्थ कार्य कायम स्मरणात राहते

निःस्वार्थ कार्य कायम स्मरणात राहते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ