देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 9, 2026
in मराठवाडा
0
ग्राहकहित रक्षणासाठी ग्राहक पंचायतची लोकचळवळ
Please Share

प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांचे प्रतिपादन, सेलू येथे प्रांतस्तरीय कार्यकर्ता अभ्यासवर्ग उत्साहात

सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही केवळ संस्था नसून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारी व्यापक लोकचळवळ आहे. कार्यकर्ता अभ्यासवर्गात सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याने ग्राहक हिताचा विचार आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे रुजवावा, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले.

सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, ८ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांतच्या वतीने एकदिवसीय प्रांतस्तरीय कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह विकास पिंगळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी राष्ट्रीय आयाम प्रमुख अरूण देशपांडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, मार्गदर्शक रमेश टाकळकर, देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटनपर भाषणात विकास पिंगळे म्हणाले की, सर्वसामान्य ग्राहकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि शोषणमुक्त समाजनिर्मितीचा देशव्यापी लढा उभारणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आहे.

राष्ट्रीय आयाम प्रमुख अरूण देशपांडे यांनी मनोगतात सांगितले की, कार्यकर्ता अभ्यासवर्गातून वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ, आदर्श आणि सक्षम कार्यकर्ते घडतात. ग्राहक जागृतीसाठी चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे प्रशिक्षित कार्यकर्ते येथे घडवले जातात.मार्गदर्शन करताना रमेश टाकळकर यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्ता अभ्यासवर्ग हा केवळ औपचारिक उपक्रम नसून संघटनेचा कणा मजबूत करण्याची प्रक्रिया आहे.

समाजात ग्राहकांची फसवणूक, अन्याय, कायद्याविषयी अज्ञान आणि प्रशासकीय अडथळे वाढत असताना कार्यकर्ता केवळ उत्साही नसून प्रशिक्षित, जागरूक आणि वैचारिकदृष्ट्या ठाम असणे आवश्यक आहे.प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले की, अभ्यासवर्गातून कार्यकर्त्यांना संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, कार्यपद्धती, कायदेशीर बाबी तसेच जनतेत काम करताना घ्यावयाची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन मिळते. नव्या कार्यकर्त्यांना दिशा मिळते, तर अनुभवी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होतो.

प्रास्ताविकात डॉ. विलास मोरे यांनी सांगितले की, एकसंध विचार, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समन्वयाने काम करणारे कार्यकर्ते हीच संघटनेची खरी ताकद आहे. अभ्यासवर्ग हा केवळ आजसाठी नव्हे, तर उद्याच्या सामाजिक लढ्यासाठीची तयारी आहे.या अभ्यासवर्गात छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील १२५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रांत पर्यावरण प्रमुख डॉ. संगीता आवचार यांनी केले, तर सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्ण, कृतीशील आणि समाजाभिमुख कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.आहेर बोरगाव येथील नितीन विद्यालयातील शिक्षक संतोष तारडे यांनी अभ्यासवर्गाच्या प्रवेशद्वारासमोर काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. देवगिरी प्रांतातून आलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या रांगोळीचे विशेष कौतुक केले.अभ्यासवर्गाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेकर, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, प्रा. कमलाकर कदम, प्रदीप कौसडीकर, नागेश कान्हेकर, सुनील गायकवाड, नागोराव देशमुख, विनायक जोशी, सिद्धार्थ गायकवाड, भागवत काकडे, शुकाचार्य शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,796
Please Share
Previous Post

श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

Next Post

स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत

स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव‌‌ : नगराध्यक्ष मिलिंद सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ