देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्याला वाढीव निधी द्यावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 13, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्याला वाढीव निधी द्यावा
Please Share

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री बोर्डीकर यांची मागणी

परभणी , दि. 12 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे 12 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैठक पार पडली. परभणी जिल्हयासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 साठी निर्धारित करून दिलेली कमाल वित्तीय मर्यादा रुपये 311.03 कोटी रुपयांची आहे. मात्र बैठकीत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्ह्याच्या स्थानिक गरजा व प्राथमिकता विचारात घेऊन वाढीव निधी देण्याची मागणी केली.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रारुप आराखडयाचे प्रभावीपणे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे व विभागप्रमुखांचीही उपस्थिती होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी वाढीव निधीची मागणी केली. परभणी जिल्ह्यातील निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच मानव विकास योजनेतून मुलींसाठी बससंख्या वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती व नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे रोजगारनिर्मितीसाठी अधिकचा निधी देण्याची मागणी केली. जिल्हयातील एकल महिलांचे सर्वेक्षण चांगल्या प्रकारे करण्यात आले असून त्यांच्या रोजगारासाठी देखील वाढीव निधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 साठी कमाल वित्तीय मर्यादा रुपये 311.03 कोटी रुपयांची आहे. जिल्हयातील विकासकामांसाठी यामध्ये वाढ करुन रुपये 294 कोटी वाढीव निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रारंभी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे सांगितले की, जिल्ह्यातील विकासकामांची व्याप्ती लक्षात घेता वाढीव निधीची आवश्यकता आहे. प्राचीन मंदिरे, बारव आणि पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी अधिक निधी मिळाल्यास पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच, मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीकरिता अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Post Views: 1,821
Please Share
Previous Post

परभणी झेडपीत आजी, नातवाचा विजय चर्चेत

Next Post

जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ