देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 13, 2026
in परभणी
0
जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू
Please Share

अकोली परिसरातील घटना, गंगाखेड शहरावर शोककळा

परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे (मध्यप्रदेश) निघालेल्या गंगाखेड येथील भाविकांच्या वाहनाचा (एम.एच-१४-के-एफ-२७९०) तालुक्यातील अकोली पुलाजवळ गुरूवारी, १२ फेब्रुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

गंगाखेड येथील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक तीर्थस्थळी दर्शनासाठी गंगाखेडहून जिंतूरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की, आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर व रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी आश्रोबा औटी (वय २८, रा. खडकपुरा) बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय २९ रा. तारुमोहल्ला), कृष्णा बालाजी गुट्टे (वय २६ रा. कोद्री रोड) रोहन संजय राठोड (वय २५ रा. लक्ष्मीनगर) या चौघांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे (वय २८, रा. खडकपुरा) हा अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे व वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल उपविभाग यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.गंगाखेड परिसरात शोककळादेवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने गंगाखेड व जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रमोद पारवे, डॉ. मोहिनी हरकळ, रुग्ण कक्षसेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. बिट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून एम.एच-१४-के-एफ-२७९० या वाहनाचा चालक अभिजीत दतात्रय शिंगाडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक विजय जाधव करीत आहेत.

Post Views: 1,851
Please Share
Previous Post

परभणी जिल्ह्याला वाढीव निधी द्यावा

Next Post

महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल

महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ