देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 13, 2026
in परभणी, मराठवाडा
0
महापौरपदी शिवसेना उबाठाचे सय्यद इकबाल
Please Share

उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड

परभणी : परभणी शहर महानगरपालिका महापौरपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांची निवड झाली आहे.महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजीबी.रघुनाथ सभागृहात उत्साहात पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कामकाज पाहिले. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, सहआयुक्त महेश गायकवाड, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, नगर सचिव विकास रत्नापारखे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वपक्षीय व अपक्ष अशा एकूण ६५ सदस्यांची उपस्थिती होती. प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे सदस्य भगवानरावजी वाघमारे यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास विजयरावजी जामकर यांनी अनुमोदन दिले. पिठासीन अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. महापौर पदासाठी प्राप्त १४ अर्जांपैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या तिरूमला मोकींद खिल्लारे व शिवसेना (उबाठा) गटाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेअंती भाजप उमेदवारास २६ मते मिळाली, तर शिवसेना (उबाठा) गटाचे सय्यद इकबाल यांना ३९ मते पडली. यामध्ये त्यांना शिवसेना उबाठा २५ काँग्रेस १२, राष्ट्रवादी १ आणि १ अपक्ष सदस्यांचे पाठबळ लाभले. पिठासीन अधिकाऱ्यांनी सय्यद एकबाल यांची महापौरपदी निवड झाल्याचे घोषित केले.त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी एकूण ७ अर्जांपैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली. उर्वरित उमेदवार काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख व राष्ट्रवादी पक्षाच्या नाजेमा बेगम शे. अ. रहीम यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये गणेश देशमुख यांना ३८ मते मिळाली, तर नाजेमा बेगम यांना २७ मते मिळाली. बहुमताच्या आधारे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी नवनियुक्त महापौर सय्यद एकबाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उबाठा, काँग्रेस समर्थकांचा जल्लोष दरम्यान, परभणी शहर महानगरपालिका महापौरपदी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद एकबाल सय्यद खाजा आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांच्या दणदणीत विजयानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेना उबाठाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 1,982
Please Share
Previous Post

जिंतुरजवळ भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू

Next Post

तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा

तीन शाळांना ग्रंथभेट देऊन वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ