सेलूत शिंदे टाकळी केंद्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री आणि शिंदे टाकळी येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमधील नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, नगरसेवक मनीष कदम आणि पंचायत समिती सदस्य प्रभाकर गजमल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच अश्विनी कैलास पवार, नंदाराम रामेश्वर पवार, बबीता ठाकूर, केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सविता बसेन आणि अशोक ताठे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि ईश्वरीय स्मृतीने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवपूर्ण जीवनाबद्दल २५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात सविता बहेन यांनी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सीमा बहेन आणि ब्रह्माकुमारी वैशाली यांनी केले, तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी राधा बहेन यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ब्रह्माभोजनाने झाली.





