देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 6, 2026
in परभणी
0
इस्रो भेटीसाठी ७ मार्चरोजी सेलू तालुकास्तरीय परीक्षा
Please Share

पंचायत समिती सेलूचा अभिनव उपक्रम, ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्ने आकाशात

सेलू / प्रतिनिधी : सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान व अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सेलूच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) केंद्राला भेट देण्याची संधी मिळावी यासाठी विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता तालुकास्तरीय परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

ही परीक्षा सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ७ व ८ च्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित राहणार आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणार असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची आणि सामान्य ज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ५० टक्के प्रश्न गणित व बुद्धिमत्ता चाचणीवर, ४० टक्के प्रश्न सामान्यज्ञानावर तर १० टक्के प्रश्न इंग्रजी विषयावर आधारित असतील.पंचायत समिती सेलूच्या सेस फंडातून सन २०२५-२०२६ साठी विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून किमान ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून उर्दू माध्यमातून एका विद्यार्थ्यास संधी देण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष माहिती मिळण्याची संधी मिळणार आहे.

परीक्षेची केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत : १. जिल्हा परिषद प्रशाला, देऊळगाव गात२. जिल्हा परिषद प्रशाला, गुगळी धामणगाव३. जिल्हा परिषद प्रशाला, वालूर४. केंद्रीय प्राथमिक शाळा, चिकलठाणा५. नूतन प्राथमिक विद्यालय, सेलू६. केंद्रीय प्राथमिक शाळा, कुपटा७. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गात८. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोरेगाव

इस्रो या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून त्यातून विज्ञान विषयाबद्दल अधिक आकर्षण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा उपक्रम पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून पंचायत समिती सेलू त्याची अंमलबजावणी करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर यांच्या पाठबळाने सदर उपक्रमाला प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांची माहिती मिळावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि भविष्यात विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.या तालुकास्तरीय परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सेलूच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाबद्दलची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना मोठ्या संस्थांचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी याबद्दल पालकमंत्री महोदया आग्रही आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी वातावरण निर्मिती होईल. तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये सकारात्मक स्पर्धात्मकता निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल – उदय जाधव, गटविकास अधिकारी

Post Views: 1,627
Please Share
Previous Post

कवी इंद्रजित भालेराव यांना कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर

Next Post

महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे

महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ