देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 16, 2026
in परभणी
0
महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते
Please Share

महाभारत संदेश कथा : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

सेलू : सेलू येथे आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी महाभारत संदेश कथेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाभारतातील विविध प्रसंगांचा उलगडा करत त्यांनी मानवी जीवनातील नीतिमत्ता, धैर्य आणि धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. अत्यंत मोठ्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला दोन गोष्टींची गरज असते; एक म्हणजे दैवी शक्तीचे पाठबळ आणि दुसरे म्हणजे खचलेले मन सावरणारी प्रेरणा. महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते.

स्वामीजींनी सांगितले की, जेव्हा पांडवांना १-२ नव्हे तर १२ वर्षांचा वनवास घडला, तेव्हा त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मणही वनात जाण्यास तयार झाले. धर्माभिमानी पांडवांनी त्यांना विचारले की, वनात तुम्ही काय कराल? तेव्हा त्या विद्वानांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक होते. ते म्हणाले की, आम्ही दुपारपर्यंत अनुष्ठान करू आणि दुपारी तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या प्रेरक कथा ऐकवू. अत्यंत मोठ्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला दोन गोष्टींची गरज असते; एक म्हणजे दैवी शक्तीचे पाठबळ आणि दुसरे म्हणजे खचलेले मन सावरणारी प्रेरणा. महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते.

चूक सुधारण्याची संधी आणि धृतराष्ट्राचा मोह

कथेत धृतराष्ट्र आणि विदूर यांच्यातील संवादाचा उल्लेख करताना स्वामीजी म्हणाले की, माणसाकडून चूक झाली तरी ती सुधारण्याची अक्कल त्याच्याकडे असायला हवी. विदुरांनी धृतराष्ट्राला स्पष्ट शब्दांत आरसा दाखवला होता. सभेत द्रौपदीचा अपमान होत असताना गप्प राहणे ही धृतराष्ट्राची मोठी चूक होती. तरीही विदुरांनी सांगितले होते की, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही हे युद्ध टाळू शकता. मात्र, पुत्राच्या मोहापायी धृतराष्ट्राने सत्याचा मार्ग स्वीकारला नाही, ज्याचा परिणाम कुळाच्या नाशात झाला.धर्माचे पालन आणि युधिष्ठिराचा आदर्शयक्ष प्रश्नांच्या प्रसंगावर प्रकाश टाकताना स्वामीजींनी युधिष्ठिराच्या धर्मनिष्ठेचे कौतुक केले. जेव्हा यक्षाने चार मृत भावांपैकी एकाला जिवंत करण्याचे वरदान दिले, तेव्हा युधिष्ठिराने भीम किंवा अर्जुनाऐवजी नकुलाला जिवंत करण्याची मागणी केली. यामागील कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला की, माझ्या पित्याला दोन पत्नी होत्या. कुंती मातेचा एक पुत्र म्हणून मी जिवंत आहे, मग माद्री मातेचाही एक पुत्र जिवंत असावा हाच खरा न्याय आणि धर्म आहे. युद्ध जिंकण्यापेक्षा धर्माचे पालन करणे अधिक महत्त्वाचे असते, हा संदेश यातून मिळतो.

आत्मविश्वास देणारा सखा : श्रीकृष्ण

पांडव वनवासात असताना भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले. त्यावेळी कृष्ण रागावतील अशी पांडवांना भीती होती, परंतु कृष्णाने त्यांना धीर दिला. कृष्ण म्हणाले की, पूर्ण जग तुमच्या विरोधात गेले तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला उपदेशापेक्षा सहानुभूती आणि कोणीतरी सोबत असल्याची खात्री हवी असते. तोच आत्मविश्वास कृष्णाने पांडवांना दिला.या कथेच्या माध्यमातून स्वामीजींनी प्रतिपादन केले की, संतांची वाणी आणि पुराणातील कथा मानवाला आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांपासून वाचवू शकतात. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी सत्संग आणि धर्माची साथ सोडू नये, हाच महाभारताचा मुख्य संदेश आहे.

Post Views: 1,655
Please Share
Previous Post

डॉ.सदानंद दाते सेबीचे कार्यकारी संचालक

Next Post

कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन

कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ