देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 16, 2026
in परभणी
0
कमलाबाई बाहेती सभागृहाचे उद्घाटन
Please Share

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, सेलूतील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत कार्यक्रम

सेलू : सेलू शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागाच्या परिसरात कै.सौ.कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते रविवार, दि.१५ मार्च २०२६ रोजी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या रेखा राठी (छत्रपती संभाजीनगर) यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक निशा पाटील आणि सुरजदेवी मालीवाल यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी सांगितले की, या सभागृहाच्या उभारणीत आजी माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण प्रेमी नागरिकांनीही भरीव आर्थिक योगदान दिले असून बाहेती परिवाराच्या मोलाच्या आर्थिक योगदानाने सभागृहाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमात रेखा राठी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवणारायणजी बाहेती, विणा बाहेती, नंदकिशोरजी बाहेती, कांचन बाहेती, रामवल्लभजी बाहेती आणि रमा बाहेती यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे आणि पूजा महाजन यांनी अभंग सादर केला. त्यांना अतुल पाटील आणि गिरीश दीक्षित यांनी साथसंगत दिली. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. भालचंद्र गांजापूरकर यांनी आभार मानले.

यानिमित्ताने विद्यार्थिनींनी विविध संतांचे देखावे सादर करून लक्ष वेधून घेतले. उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, कार्यकारिणी सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, डी.बी.घोगरे, डॉ.बाबासाहेब थोरे, नागेश देशमुख, कैलास मलवडे, शशिकांत देशपांडे, सुहास देऊळगावकर, सतीश कुंडीकर, किशोर ढोके, सुरेखा आगळे आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

शिक्षणासोबतच मुलींच्या संरक्षणाची गरज : स्वामी गोविंद देव गिरिजी

उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज म्हणाले, की एका कन्येचे जर चांगल्या प्रकारे शिक्षण झाले आणि तिच्यावर चांगले संस्कार झाले, तर दोन कुळांचा उद्धार होतो. मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांचे संरक्षण ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येकाने आईवडिलांची कीर्ती वाढेल यांसह समाज, देश आणि पिढ्यानपिढ्यांचे भविष्य उज्ज्वलेतेसाठी रचनात्मक सामाजिक कार्य करावे.

Post Views: 1,703
Please Share
Previous Post

महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

Next Post

निरपेक्ष सेवेतून जग जिंकता येते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महापुरुषांच्या कथा ऐकल्याने आत्मबळ वाढते

निरपेक्ष सेवेतून जग जिंकता येते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ