देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘व्हाट्सॲप’च्या माध्यमातून मूलभूत सोयीसुविधा मार्गी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 13, 2026
in परभणी
0
‘व्हाट्सॲप’च्या माध्यमातून मूलभूत सोयीसुविधा मार्गी
Please Share

सेलूतील कॉंग्रेसचे नगरसेवक मिलिंद पवार यांच्या कार्यशैलीचे नागरिकांतून कौतुक

देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतात, याचे उत्तम उदाहरण सेलू नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागाचे काँग्रेसचे तरुण नगरसेवक मिलिंद पवार यांनी व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न जागच्या जागी सोडविण्यावर अधिक भर दिला आहे. सध्या पावसाळा तोंडावर असल्याने त्यांनी प्रभागात स्वच्छतेची एक धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, याची संपूर्ण सेलू शहरात कमालीची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

प्रभाग क्रमांक आठ हा सुमारे सहा हजार लोकवस्तीचा सेलू शहराचा मध्यवर्ती भाग आहे. रहिवासी वस्त्यांमध्ये रवळगाव रस्त्यावरील भीमनगर, श्रीकृष्ण नगरचा काही भाग, मारोतीनगर, आदर्शनगर, पारीख कॉलनी, जिंतूर कॉलनी, शास्त्रीनगर, महेशनगर, केशवराज नगरचा काही भाग आणि मुख्य व्यापारपेठ मोंढा अशा विस्तीर्ण भागाचा यामध्ये समावेश आहे. व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि सुशिक्षित लोकवस्ती बहुसंख्येने आहे. कॉंग्रेसचे मिलिंद पवार आणि महानंदा हेमंतराव आडळकर प्रतिनिधित्व करित आहेत.

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण थेट आणि जलद गतीने व्हावे, यासाठी श्री.पवार यांनी प्रभागातील रहिवाशांचा एक विशेष व्हाट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर नागरिक आपल्या गल्लीतील कचरा, तुंबलेली गटारे किंवा रस्ते, नाल्या, रखडलेली कामे इतर मूलभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्या थेट मांडतात. या डिजिटल तक्रारींची दखल घेऊन अवघ्या २४ तासांच्या आत संबंधित जागेची स्वच्छता करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. तर, खड्डे, जोड रस्त्यांवरील सिमेंट ढापे आदी शक्य ती कामे तातडीने मार्गी लावली जात आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या योग्य समन्वयातून ही कामे युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलत आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावणे, मुख्य नाल्यांची तसेच अंतर्गत गटारांची सफाई करणे या कामांना प्राधान्य दिले जात आहे. मिलिंद पवार यांच्यासह ग्रुप ॲडमीन मदन पवार तसेच खंडू चव्हाण प्रभागातील विविध कामांचे अपडेट्स शेअर करतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या या गतिमान कार्यपद्धतीमुळे प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार

माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, पवन आडळकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली आणि सर्व नगरपालिका पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता आणि इतर विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. आगामी काळात मूलभूत सोयीसुविधांसह विविध विकास कामे आणि जनहिताचे उपक्रम राबवून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी शासन, प्रशासन, नागरिकांचे निश्चितच पाठबळ मिळेल,असा विश्वास आहे.- मिलिंद पवार, सदस्य तथा शिक्षण सभापती, नगरपालिका , सेलू

Post Views: 1,602
Please Share
Previous Post

सेलू मतदार यादीतील बोगस नावे वगळा

Next Post

४३ केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
४३ केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

४३ केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ