देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
Please Share

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी

परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून प्रशासनाने याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवारी, १९ जून रोजी घेण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक रूचेश जयवंशी यांनी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सुरक्षा रक्षकांना आवश्यक सूचना देत मतमोजणीपर्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेबाबतचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी व नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

Post Views: 1,299
Please Share
Previous Post

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

Next Post

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
0

जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, प्रशासनाला तत्पर उपचारांचे निर्देश परभणी, दि. २१ : यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या...

सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
0

एचएआरसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम,एकल पालक आणि अनाथ मुलांच्या पाठीवर संस्थेचा मायेचा हात; दानशूरांच्या मदतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप सेलू : परभणी...

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 20, 2026
0

मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर; १६ गंभीर जखमींवर उपचार सुरू; युद्धपातळीवर बचावकार्य परभणी : मानवत...

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ