देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम गतिमान करावा : उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांचे आवाहन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 9, 2026
in परभणी
0
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम गतिमान करावा : उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांचे आवाहन
Please Share

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सेलू येथे राजकीय पक्ष प्रमुख व पत्रकारांची बैठकसहा. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती

सेलू : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम २०२६ च्या अनुषंगाने सेलू येथे बुधवारी, ८ जुलै रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी सेलू यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३० जून २०२६ पासून सर्व बीएलओ (BLO) मार्फत मतदारांना ‘एन्युमरेशन फॉर्म’चे वाटप आणि त्याचे डिजिटायझेशन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये उपस्थित राजकीय पक्ष प्रमुख व पत्रकारांना विविध महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

सेलू तालुक्यातील कामाची सद्यस्थिती

सेलू तालुक्याअंतर्गत एकूण १६५ मतदार यादी भाग असून एकूण मतदार संख्या १,४५,५९२ एवढी आहे. यापैकी आतापर्यंत ४८,३२२ (३३%) फॉर्म्सचे वाटप करण्यात आले असून, १५,५३२ (१०.६६%) फॉर्म्सचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तालुक्यातील या कामाची प्रगती अधिक वाढवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत.या पुनरिक्षण मोहिमेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कामकाजाच्या सुलभतेसाठी शहरी भागासाठी चार आणि ग्रामीण भागासाठी सात सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरी भागासाठी: तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, मुख्याधिकारी श्री. महेश गायकवाड, ना. तहसीलदार श्री. गजानन इनामदार आणि सहायक निबंधक श्री. संदीप तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी श्री. उदय जाधव, ना. तहसीलदार (निवडणूक) श्रीमती जयश्री कोल्हे, उपअभियंता (ग्रा. पाणी पुरवठा) श्री. कठाळू जाधव, गट शिक्षणाधिकारी श्री. गजानन वाघमारे, तालुका कृषी अधिकारी गुलाब शिंदे, उपविभागीय अधिकारी (गुणनियंत्रण उपविभाग) श्री. विजय काकडे आणि सा.बां. उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. बळीराम माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बैठकीतील महत्त्वाचे निर्देश- ज्या मतदारांचे आधीचे फोटो स्पष्ट आणि चांगले आहेत, त्यांचे नवीन फोटो घेण्याची आवश्यकता भासणार नाही. केवळ अस्पष्ट (Bluer) फोटो असणाऱ्या मतदारांचेच नवीन फोटो घेण्यात यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गावातील नागरिकांना किंवा कोणालाही बीएलओ संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधून अवगत करावे.या संपूर्ण मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी बीएलओ कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या दैनिक वृत्तपत्रांमधून या मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश लाहोटी यांनी केले. या बैठकीला तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Post Views: 1,312
Please Share
Previous Post

माऊलींच्या मंदिरात वालूरकर महाराजांचे कीर्तन

Next Post

नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ