पाल्याच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर बुरे यांचा सलग सातव्या वर्षी सामाजिक उपक्रम
सेलू : येथील जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेत विद्यार्थी वरद ज्ञानेश्वर बुरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर बुरे यांच्या पुढाकारातून सलग सातव्या वर्षी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन व खाऊ वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात नवनियुक्त केंद्रप्रमुख मोहजम शेख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र पाठक होते. प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआयचे व्यवस्थापक विवेक कुमार, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुरेश काबरा व तुळजाभवानी बँकेचे व्यवस्थापक श्री. मगर उपस्थित होते. काबरा यांनी शाळेला भविष्यात आवश्यक वस्तू देण्याचा मानस व्यक्त केला.याप्रसंगी कृष्णा शिंदे, श्री.राठी, श्री. खांडवीकर, राजू खरात, श्री. जडेमामा, गणेश घुमरे, सोमनाथ बुरे आणि श्री. जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन भगवान पावडे यांनी केले व कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती विजयमाला काळे, विष्णू कटारे, सुनील राठोड, मंगेश शेळके व बाळू धनवे यांनी परिश्रम घेतले.





