देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

‘हेल्थकेअर लीडर’ पुरस्काराने डॉ. पिंपरकर सन्मानित

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in वाशिम
0
‘हेल्थकेअर लीडर’ पुरस्काराने डॉ. पिंपरकर सन्मानित
Please Share

वाशिममधील पिंपरकर परिवाराच्या वैद्यकीय वारशाचा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपकडून गौरव

वाशिम ( फुलचंद भगत) : आठ दशकांचा वारसा आणि तीन पिढ्यांची समृद्ध परंपरा असलेल्या पिंपरकर परिवाराला देशातील अग्रगण्य अशा टाइम्स ऑफ इंडिया परिवाराने ‘हेल्थकेअर लीडर’ या सन्मानाने गौरान्वित केले आहे.पिंपरकर परिवारातील तिसऱ्या पिढीचे डॉ. जयंत पिंपरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. एकता पिंपरकर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते ‘हेल्थकेअर लीडर’ हा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचा पुरस्कार स्वीकारला.

पिंपरकर परिवार आणि आयुर्वेद, तसेच पिंपरकर परिवार आणि रुग्णसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पिंपरकर परिवाराने आयुर्वेदाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपलेसे केले आहे. ‘आयुर्वेद रत्न’ असलेले डॉ. गंगाधरराव पिंपरकर हे या परिवाराचे कुलगुरू. १९४० पासून म्हणजेच अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी मालेगाव येथून आयुर्वेद सेवेला सुरुवात केली होती. हाच वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. चंद्रशेखर गंगाधरराव पिंपरकर यांनी १९६५ पासून पुढे चालवला. वंध्यत्व, पक्षाघात, ज्वर यांवरील हमखास उपचारांसाठी त्यांची केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर राज्याच्या राजधानीपर्यंत ख्याती होती.

डोंबिवलीपासून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत.हाच वारसा तिसऱ्या पिढीतील डॉ. जयंत चंद्रशेखर पिंपरकर यांनी २००० पासून पुढे नेला. मात्र, त्यांनी आपले आजोबा आणि वडिलांचे कार्यक्षेत्र न निवडता मंगरूळपीर हे शहर रुग्णसेवेसाठी निवडले. वारसा तोच, चिकित्सा पद्धती तीच; पण त्याला त्यांनी अत्याधुनिकतेची जोड दिली. यात त्यांना सुविद्य पत्नी डॉ. सौ. एकता यांची मोलाची साथ मिळाली. आज ‘पिंपरकर हॉस्पिटल, मंगरूळपीर’ केवळ मंगरूळपीर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात आपले वेगळे अस्तित्व राखून कार्यरत आहे.आता या परिवाराला चौथ्या पिढीची प्रतीक्षा आहे. डॉ. जयंत आणि डॉ. एकता पिंपरकर यांचे सुपुत्र अथर्व हे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत. त्यामुळे पिंपरकर परिवाराचा रुग्णसेवेचा हा वैद्यकीय वारसा इथेच थांबणार नाही, तर आजपर्यंत हितचिंतक, मित्रपरिवार आणि रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर तो असाच अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास या वेळी डॉ. पिंपरकर यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,320
Please Share
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

Next Post

विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी.

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी.

विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ