देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in वाशिम
0
प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
Please Share

रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीगचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम : मानवी जीवनात रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांचे आरोग्यदायी फायदे मोठे आहेत. हवामान बदलामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असून शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीग स्पर्धा २०२६च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार सईताई डाहाके, कृषी सहसंचालक घोरपडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. भरणे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करीत असून आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये उतरवत आहेत. रासायनिक खतांना पर्याय म्हणून नैसर्गिक खतांचा वापर करण्याकडेही शेतकरी वळत आहेत. रानभाजी महोत्सव व फार्मर ग्रुप लीगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून यामध्ये ७६५ शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला, ही बाब कौतुकास्पद आहे.हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीची पद्धत बदलणे गरजेचे आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच कृषी विभागानेही त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे. शासन शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहील, असेही त्यांनी सांगितले.*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मोठा लाभ*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असून वीजबिलात सवलतीसह शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे.जिल्ह्याची विकसनशील जिल्हा अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री ना. भरणे यांनी केले.खासदार संजय देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शेतकरी गटांनी एकत्रितपणे काम करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि शेतीतील नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी संचालन केले. यावेळी जिल्हास्तरीय १० गटांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील सतीआई गटाचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील युवा शेतकरी उद्योजक समूह आणि दोनद (बु.) येथील बलराम शेतकरी गट यांनीही या यादीत स्थान मिळविले आहे. मानोरा तालुक्यातील कुपटा येथील बळीराजा शेतकरी गट तसेच खेरडा येथील बळीराजा शेतकरी महिला गट यांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील बळीराजा महिला शेतकरी गट, वरला येथील जय बाळूमामा गट आणि वाई येथील नंदकिशोर नैसर्गिक गट यांनीही जिल्हास्तरीय टॉप १० मध्ये स्थान मिळविले आहे. रिसोड तालुक्यातील घोटा येथील संगमेश्वर शेतकरी उत्पादक गट आणि कवठा खु. येथील प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट यांचाही समावेश आहे. तसेच चिया पीक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

रानभाजी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी

रानभाजी महोत्सवात शेतकरी व शेतकरी गटांनी उभारलेल्या जवळपास ३० स्टॉलला पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या स्टॉलवर सादर करण्यात आलेल्या सुमारे ३० विविध रानभाज्यांची त्यांनी माहिती घेतली. रानभाज्यांचे महत्त्व, त्यांची उपलब्धता, पौष्टिकता तसेच शेतकऱ्यांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधींबाबत त्यांनी शेतकरी गटांशी संवाद साधला.कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, शेतकरी, शेतकरी गटांचे सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.

Post Views: 1,424
Please Share
Previous Post

पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

Next Post

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ