देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in वाशिम
0
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे
Please Share

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा व विद्यार्थी हिताच्या योजनांचा आढावा

देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम : जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी निश्चित केलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळांमधील गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात शिक्षण विभाग व डायटच्या वतीने आयोजित शैक्षणिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार अमित झनक, आमदार शाम खोडे, आमदार भावना गवळी, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, नगराध्यक्ष अनिल केंदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी उपाययोजनांवर भर

बैठकीत पीजीआय अर्थात कामगिरी श्रेणी निर्देशांकांतर्गत देश, राज्य आणि वाशिम जिल्ह्याच्या कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. जिल्ह्याची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.‘राष्ट्रप्रथम’ उपक्रमांतर्गत आत्मरक्षा प्रशिक्षण, सैनिकी शिक्षण, योग शिक्षण व शैक्षणिक प्रबोधन यांचा आढावा घेण्यात आला. तसेच १५ ऑगस्टच्या पूर्वतयारीसह अधिकारी यांच्या शाळा भेटी आणि विद्यार्थी सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली.

३० हजार शिक्षकांची भरती करणार

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता लक्षात घेता पटसंख्येच्या आधारावर शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच लवकरच ३० हजार शिक्षकांची मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी केली.

शाळांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य

समग्र शिक्षा अभियानातून मंजूर क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि ग्रंथालय या सुविधांच्या कामांची सद्यस्थिती व प्रगतीचे सादरीकरण करण्यात आले. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी प्रवेश, उत्तीर्ण विद्यार्थी आणि पात्र विद्यार्थ्यांचाही आढावा घेण्यात आला.केंद्रप्रमुख भरती व कार्यभार, माजी विद्यार्थी संघ, निपुण महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व बूट वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘आयडॉल शिक्षकांचा’ सन्मान

जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साखरा येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मीना मापारी व विनोद झनक तसेच जिल्हा परिषद शाळा, तोंडगाव येथील संतोष इढोळे यांचा शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मीना मापारी व विनोद झनक यांनी आपल्या शाळेच्या शैक्षणिक यशाची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली.खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार किरण सरनाईक, आमदार शाम खोडे, आमदार अमित झनक आणि आमदार धीरज लिंगाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले. डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन आणि शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची शैक्षणिक सद्यस्थिती, प्रगती आणि पुढील नियोजनाची माहिती दिली. संचालन उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.बैठकीत जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, शाळांमधील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

Post Views: 1,488
Please Share
Previous Post

प्रगत शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ